बाबूश मोन्सेरात यांच्यावरील आरोप कायम
By admin | Published: September 13, 2014 01:31 AM2014-09-13T01:31:12+5:302014-09-13T01:33:03+5:30
बार्देस : पणजी पोलीस स्थानकावर १९ फेब्रुवारी २००८ रोजी झालेल्या हल्लाप्रकरणी सांताक्रुझ मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार बाबूश मोन्सेरात
राज चिंचणकर, मुंबई
बाबा आमटे यांनी अभिनेता नाना पाटेकर यांना त्यांचा मानसपुत्र मानले होते. नानानेही हे नाते नेहमी जपले. बाबांच्या हयातीत आणि त्यानंतरही नानाची आमटे परिवारातील सदस्य ही ओळख कायम आहे. बाबांच्या सान्निध्यात राहून नानाने त्यांचे कार्य जवळून पाहिले आहे. नानातला कलावंतही हा अनुभव घेत राहिला. एका सच्च्या कलावंताला आव्हान वाटावे असे व्यक्तिमत्त्व बाबा आमटे यांचे होते मला बाबा आमटेंची भूमिका साकार करायचीय, अशी इच्छाच नानाने आता स्पष्टपणे बोलून दाखवली आहे. ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ या मराठी चित्रपटात नानाने प्रकाश आमटे यांची भूमिका रंगवली आहे. त्यानिमित्ताने बोलताना नानाने मनातले गुज अलगद उलगडले.
मी आनंदवनातच राहणार असे बाबांना म्हणालो होतो; परंतु हे सगळे तुझेच असले तरी तुझा पिंड कलावंताचा आहे, तू इथे रुजणार नाहीस, असे बाबा म्हणायचे. माझ्यावरचा त्यांचा असलेला विश्वास पाहता आज मला वाटते की मला बाबांची भूमिका करायलाच हवी. म्हणजे बाबांचा आणि त्यांच्या मुलाचा असे माझे दोन्ही रोल होतील. फक्त प्रकाशची भूमिका करणे सोपे होते; परंतु बाबांचे विचार, त्यांचे अस्खलित इंग्रजी हे सगळे अंगावर येते. प्रकाश ही एक झुळूक आहे; तर बाबा आमटे हे एक झंझावात होते, त्यामुळेबाबांची भूमिका करायची इच्छा आहे, असे नानाने स्पष्ट केले.
नानाने प्रकाश आमटे यांच्या साकारलेल्या व्यक्तिरेखेविषयी बोलताना समस्त आमटे कुटुंबीयांच्या कार्याला सलाम केला. माझी जी ओळख आहे, त्याला विरोधाभास ठरावी अशी ही भूमिका आहे. यात कुठेही आक्रस्ताळेपणा किंवा आग्रहीपणा नाही. कामात आनंद शोधणारी आमटे परिवारासारखी माणसे मोठीच असतात. माझ्यात ही माणसे झिरपत गेली, अशा शब्दांत नानाने आमटे परिवाराचे जीवनातील महत्त्व विशद केले.
मराठीत ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ आणि हिंदीत ‘हेमलकसा’ नावाने निर्माण करण्यात आला आहे. नानासोबत सोनाली कुलकर्णीने यात मंदा आमटे यांची भूमिका केलीआहे. समृद्धी पोरे यांनी चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद व दिग्दर्शन अशी चौफेर जबाबदारी सांभाळली आहे. आमटेंचे कार्य जगासाठी खूप महत्त्वाचे आहे. मी फक्त निमित्तमात्र आहे, अशा भावना समृद्धी पोरे यांनी व्यक्त केल्या.