धक्कादायक! सरकारी नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक 

By काशिराम म्हांबरे | Published: December 10, 2023 04:15 PM2023-12-10T16:15:41+5:302023-12-10T16:18:40+5:30

सरकारी नोकरी देण्याचे आम्हीच दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी गुन्हा आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Cheating with the lure of a government job in mhapsa goa | धक्कादायक! सरकारी नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक 

धक्कादायक! सरकारी नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक 

काशीराम म्हाबरे ,म्हापसा : सरकारी नोकरी देण्याचे आम्हीच दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी अमर मांद्रेकर (पर्ये, सत्तरी) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

फसवणुकीचा प्रकार  ९ नोव्हेंबर ते  ८ डिसेंबर या कालावधीत घडला. कान्सा थिवी येथील  एका महिलेच्या भाचीला सरकारी नोकरी देण्याचे भासवून व वैद्यकीय चाचणी शुल्क म्हणून २० हजार रुपये रक्कम घेत फसवणूक केल्याप्रकरणीचा आरोप संशयितावर करण्यात आला आहे. 

तक्रारदार  महिलेला संशयित आरोपीने आपण साखळी रवींद्र भवन येथे कामाला असल्याचे सांगितले होते. त्यानंतर संशयिताने फिर्यादीला तिच्या भावाच्या मुलीला मासिक ३ लाखांची सरकारी नोकरी मिळवून देण्याची हमी दिली. नंतर संशयिताने फिर्यादीच्या भाचीची सरकारी नोकरीसाठी वैद्यकीय चाचणी करायची असल्याचे सांगून २० हजार रुपये रक्कम तिच्याकडून शुल्कापोटी घेतले. पण संशयिताने सरकारी नोकरी मिळवून दिली नाही किंवा घेतलेली रक्कम परत केली नाही.

आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात येताच तिने कोलवाळ पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी भा.दं.सं.च्या ४१९ व ४२० कलमाअंतर्गत संशयिताविरूद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय राणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भरत खरात करीत आहेत.

Web Title: Cheating with the lure of a government job in mhapsa goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.