मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर गोव्यात परतले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 06:47 PM2019-02-06T18:47:25+5:302019-02-06T18:47:43+5:30
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना दिल्लीच्या एम्स इस्पितळामधून बुधवारी दुपारी डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर मनोहर पर्रीकर बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास गोव्यात दाखल झाले आहेत.
पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना दिल्लीच्या एम्स इस्पितळामधून बुधवारी दुपारी डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर मनोहर पर्रीकर बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास गोव्यात दाखल झाले आहेत.
मनोहर पर्रीकर हे गेल्या गुरुवारी गोवा विधानसभा अधिवेशनाचे कामकाज संपल्यानंतर दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये आरोग्याच्या तपासणीसाठी गेले होते. पाच ते सहा दिवस मनोहर पर्रीकर यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. यावेळी त्यांच्या विविध चाचण्या करण्यात आल्या. सध्या त्यांच्या प्रकृतीत सुधारणा असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील एका अधिका-याने सांगितले.
Press Release-Chief Minister Shri @manoharparrikar has arrived in Goa today (06/02/2019) after completing his scheduled medical review/check-up in New Delhi.
— CMO Goa (@goacm) February 6, 2019
दरम्यान, मनोहर पर्रीकरांना भेटण्यासाठी एम्समध्ये जे खासदार गेले होते, त्यांच्याशी त्यांनी चांगल्या प्रकारे संवाद साधला. पूर्वीच्या तुलनेत आता त्यांची प्रकृती बरी आहे, असे सुत्रांनी सांगितले आहे.