गोव्याचे मुख्यमंत्री देवदर्शनासाठी सिंधुदुर्गात; माणगांव दत्त मंदिराला भेट
By किशोर कुबल | Published: November 30, 2023 01:21 PM2023-11-30T13:21:11+5:302023-11-30T13:21:32+5:30
बुधवारी त्यानी मंत्रिमंडळ बैठक घेतली व आज ते देवदर्शनासाठी सिंधदुर्गात रवाना झाले.
पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत सिंधुदुर्ग दौय्रावर असून आज सकाळी त्यांनी माणगांव येथे दत्त मंदिरात देवदर्शन घेतले.
मुख्यमंत्री तेथून कुणकेरी येथे देवी भवानीमाता देवी भावकईच्या दर्शनासाठी रवाना झाले. गेले काही दिवस मुख्यमंत्री तेलंगणा, मध्यप्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या प्रचारात व्यस्त होते. बुधवारी त्यानी मंत्रिमंडळ बैठक घेतली व आज ते देवदर्शनासाठी सिंधदुर्गात रवाना झाले.
प्राप्त माहितीनुसार सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी गावात देवी भवानीमाता सावंत यांचे कुलदैवत होय. समस्त सावंत, भोसले कुटूंबियांचे कुलदैवत कुणकेरी येथे आहे. सावंत यांचे कुटूंबीय देवीचे उत्सव तसेच इतर कार्यक्रमांच्यावेळी कूलदेवीला भेट देत असतात.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आज ते या ठिकाणी पोचले असता सावंत-भोसले परिवाराने जंगी स्वागत केले.