सर्वच खात्यांतील रिक्त पदे भरणार, आजारपणातही मुख्यमंत्री पर्रीकरांनी घेतले दमदार निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 08:40 PM2018-10-31T20:40:13+5:302018-10-31T20:40:19+5:30

मुख्यमंत्री पर्रीकर यांनी अनेक महिन्यांच्या खंडानंतर बुधवारी करंजाळे येथील आपल्या निवासस्थानी मंत्रिमंडळाची बैठक घेतली. नोकर भरतीबाबतचा मुद्दा मंत्र्यांनी बैठकीत उपस्थित केला.

Chief Minister Parrikar took advantage of vacant posts in all the departments, even in his illness | सर्वच खात्यांतील रिक्त पदे भरणार, आजारपणातही मुख्यमंत्री पर्रीकरांनी घेतले दमदार निर्णय

सर्वच खात्यांतील रिक्त पदे भरणार, आजारपणातही मुख्यमंत्री पर्रीकरांनी घेतले दमदार निर्णय

Next

पणजी : राज्यातील सर्व खात्यांमधील रिक्त पदे भरली जातील व त्यासाठी लवकरच परिपत्रक जारी केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्रीमनोहर पर्रीकर यांनी सर्व मंत्र्यांना बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत दिली. पॅरा शिक्षकांना 12 हजार रुपयांवरून 32 हजार रुपयांची वेतनवाढ देणे व बांधकाम खात्याच्या कंत्रटी मजुर संस्थेमार्फत नियुक्त केलेल्या 58 अभियंत्यांच्या वेतनात समानता आणण्याचाही प्रस्ताव बैठकीत संमत झाला. 

मुख्यमंत्री पर्रीकर यांनी अनेक महिन्यांच्या खंडानंतर बुधवारी करंजाळे येथील आपल्या निवासस्थानी मंत्रिमंडळाची बैठक घेतली. नोकर भरतीबाबतचा मुद्दा मंत्र्यांनी बैठकीत उपस्थित केला. विविध खात्यांमध्ये शेकडो पदे रिक्त असल्याने कामे होण्यात अडथळे येतात असे काही मंत्री म्हणाले. रिक्त पदे भरण्याविषयी परिपत्रक येत्या आठवड्यात जारी करण्याची सूचना आपण अधिकाऱ्यांना करीन, असे पर्रीकर यांनी सांगितले. बाजर, ट्रक मालक, खाण अवलंबित आदींसाठी खाण खाते राबवत असलेल्या कर्ज-दिलासा योजनेची मुदत आणखी सहा महिन्यांनी वाढविण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला.

25 पदांना मंजुरी 
महसुल, आयटी आणि मजुर व रोजगार अशा खात्यांमध्ये 2क्क् ते 25क् पदे रिक्त आहेत. ही सगळी पदे प्रथम भरण्याचा मंत्री रोहन खंवटे यांचा प्रस्ताव मंत्रिमंडळाने मान्य केला. विस्टीओन टेक्नीकल अॅण्ड सर्विसेस सेंटर ह्या 2.5 बिलियन डॉलरच्या कंपनीकडून गोव्यात अँकर युनीट सुरू केला जाईल. पणजीतील विद्यूत भवनच्या चौथ्या मजल्यावर ही कंपनी काम करील. माहिती तंत्रज्ञान धोरणात तरतुदी नसल्या तरी, या कंपनीला विशेष सवलती देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत झाला. विस्टीओन कंपनीमुळे अन्य आयटी कंपन्या गोव्यात येतील. गोमंतकीयांना रोजगार संधी मिळतील. विन्स्टोन कंपनी पहिल्या वर्षी 4 टक्के गोमंतकीय, दुसऱ्या वर्षी 5 टक्के व तिस:या वर्षी 6 टक्के गोमंतकीयांना रोजगार देईल, असे मंत्री खंवटे यांनी सांगितले. 3 कोटी 3 लाख रुपयांची भरपाई सरकार देईल, असे खंवटे यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री आजारी पण..
मुख्यमंत्री आजारी आहेत, त्यामुळे ते बैठकीत कमी बोलतात. मात्र ते बैठक घेऊ शकतात. त्यांच्या नाकाच्या एका पुडीत ट्युब घातलेली आहे. त्या ट्युबचा भाग मागून खालर्पयत येतो. मुख्यमंत्री बसल्यानंतर छायाचित्र एकाचबाजूने काढले जाते. त्यामुळे ती ट्यूब दिसत नाही. ते पायाकडे मुद्दाम दोन छोट्या उश्या (पिलोव) ठेवतात, असे काही मंत्र्यांनी बैठकीनंतर सांगितले. मुख्यमंत्र्यांची सकारात्मकता व आत्मविश्वास मात्र वाखाणण्याजोगा आहे, असे एका मंत्र्याने नमूद केले. र्पीकर यांच्या आरोग्यावर डॉक्टरांची नियमितपणो देखरेख असते.
...................
मंत्रिमंडळाचे निर्णय
- बाजर, ट्रक मालक आदी खाण अवलंबितांसाठी कर्ज दिलासा योजनेत मुदतवाढ
-132 पॅरा शिक्षकांना 12 हजारांवरून 32 हजारांची वेतनवाढ
- ममता योजनेंतर्गत कन्यारत्न झालेल्या मातेला 1क् हजारांची मदत
- स्वस्त धान्य दुकानदारांना ज्यादा नफा, पीओएस यंत्रची सोय
- प्रशासन सक्रिय करणार, सुसुत्रता येणार
- बांधकाम खात्याच्या 58 अभियंत्यांच्या वेतनातील तफावत दूर
- कळंगुटमधील 28 हजार चौ.मी.क्षेत्र गुंतवणूक प्रोत्साहन क्षेत्र करण्याचा प्रस्ताव पुढे ढकलला

Web Title: Chief Minister Parrikar took advantage of vacant posts in all the departments, even in his illness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.