गोवा राज्य हरित बनविणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2023 01:01 PM2023-03-06T13:01:28+5:302023-03-06T13:02:00+5:30

गोवा हरित राज्य बनविण्यावर भर दिला जात आहे. त्या दिशेने सरकारकडून विविध धोरणे राबवली जात असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.

chief minister pramod sawant said goa will make the state green | गोवा राज्य हरित बनविणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

गोवा राज्य हरित बनविणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी:गोवा हरित राज्य बनविण्यावर भर दिला जात आहे. त्या दिशेने सरकारकडून विविध धोरणे राबवली जात असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

गोवा पर्यावरण चित्रपट महोत्सव वातावरण या चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. यावेळी आययूसीएन सीईसीचे अध्यक्ष सीन सॉथे व सीएमएस सरसंचालक डॉ. वासंती राव उपस्थित होते. हा चित्रपट महोत्सव ५ ते ७ मार्च असे तीन दिवस चालणार आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की, हा चित्रपट महोत्सव इफ्फीच्या तोडीचा आहे. गोव्यात इफ्फीप्रमाणेच विविध चित्रपट महोत्सवांचे आयोजन केले जाते. मात्र, त्यापैकी गोवा सीएमएस वातावरण हा चित्रपट महोत्सव खऱ्या अर्थाने वेगळा आहे, कारण तो पूर्णपणे पर्यावरणावर आधारित आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरण वाचा, पर्यावरणाचे संवर्धन, असा संदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

गोव्यात मागील काही वर्षात रहिवासी प्रकल्पांना वाढती मागणी आहे. त्यातून जंगलतोड तसेच किनारी भागांची धूप होणे आदी प्रकार घडत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: chief minister pramod sawant said goa will make the state green

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.