मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांचा भ्रष्टाचार लपवू नये : काँग्रेस
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 06:46 PM2019-06-22T18:46:22+5:302019-06-22T18:46:37+5:30
पणजी : सरकारी कर्मचारी नोकऱ्या विकतात असे सांगून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी लाचखोर कर्मचा:यांविरुद्ध कारवाईची भूमिका मांडली आहे. मुख्यमंत्री जर ...
पणजी : सरकारी कर्मचारी नोकऱ्या विकतात असे सांगून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी लाचखोर कर्मचा:यांविरुद्ध कारवाईची भूमिका मांडली आहे. मुख्यमंत्री जर खरोखर याविषयी गंभीर असतील तर आम्ही त्याचे स्वागत करतो पण मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांच्या स्तरावर होत असलेला मोठा भ्रष्टाचार पहावा व त्याविरुद्ध बोलावे, तरच लोक त्यांच्या हेतूमागिल सत्यता मान्य करतील, असा सल्ला गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी शनिवारी येथे दिला.
चोडणकर यांनी युवक काँग्रेसचे अध्यक्ष वरद म्हादोळकर, प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. मुख्यमंत्र्यांनी ते सरकारी कर्मचा:यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई करू पाहत आहेत असा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. ते उगाच आभास निर्माण करत आहेत की ते खरोखर कारवाई करू पाहतात असा प्रश्न निर्माण होतो. कारण एक-दोन सरकारी कर्मचारी नोक:या विकतात अशी तक्रार आल्याचे मुख्यमंत्री म्हणतात. मात्र मंत्र्यांच्या स्तरावर जो प्रचंड भ्रष्ट व्यवहार होत असतो, त्याविरुद्ध मुख्यमंत्री काहीच बोलत नाहीत. मुख्यमंत्री त्याविषयी गप्प का आहेत असा प्रश्न लोकांना पडतोय. ते भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई करण्याविषयी प्रामाणिक असतील तर ते निश्चितच मंत्र्यांच्याही भ्रष्टाचाराविरुद्ध बोलतील असे चोडणकर म्हणाले.
कारकुनांसारखे काही सरकारी कर्मचारी लाचखोरी करत असतील तर त्यांच्याविरुद्ध कारवाई व्हायलाच हवी. आम्ही मुख्यमंत्र्यांच्या विधानाचे स्वागत करून पाठींबाही देतो पण मुख्यमंत्र्यांना अगोदर मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध पाऊले उचलावी लागतील. कारण ते प्रमाण मोठे आहे. मांडवी नदीत एका बेकायदा तरंगत्या हॉटेलचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नुकतेच उद्घाटन केले. ज्या हॉटेलला सीआरङोड किंवा अन्य कसलाच परवाना नाही, त्याचे मुख्यमंत्री उद्घाटन करतात. त्यातून ते सरकारी यंत्रणाना कोणता संदेश देतात ते कळून येते. तक्रार आल्यानंतर सरकारी यंत्रणा जेव्हा त्या हॉटेलची पाहणी करण्यासाठी जातात तेव्हा ते तरंगते हॉटेल काहीजण गायब करतात. ते आमोणा- साखळी येथे कुणी तरी नेऊन ठेवल्याची चर्चा आहे. या हॉटेलशी एका मंत्र्याचाच संबंध आहे, असे चोडणकर म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी कारवाई करावी, असेही चोडणकर म्हणाले.