मुख्य सचिवांसाठी मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न
By admin | Published: March 4, 2015 01:50 AM2015-03-04T01:50:05+5:302015-03-04T01:57:28+5:30
पणजी : गोव्याचे मुख्य सचिव केवल शर्मा यांची अवघ्या दोन महिन्यांत बदली झाल्याचा विषय मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनीही
पणजी : गोव्याचे मुख्य सचिव केवल शर्मा यांची अवघ्या दोन महिन्यांत बदली झाल्याचा विषय मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनीही गंभीरपणे घेतला आहे. शर्मा यांना अजून गोवा सरकारने सेवेतून मुक्त केलेले नाही. केंद्रीय गृहमंत्र्यांशी या विषयावर अखेरचे बोलावे, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी ठरविले आहे.
शर्मा यांची बदली व नियुक्ती दिल्लीचे मुख्य सचिव म्हणून झाली असून मंगळवारी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून गोवा सरकारला त्याबाबतचा आदेश मिळाला. या प्रतिनिधीने मुख्यमंत्री पार्सेकर यांना याविषयी विचारले असता ते म्हणाले की, शर्मा यांना अजून आम्ही सेवामुक्त केलेले नाही. मात्र, त्यांच्या बदलीचा आदेश निघाल्याने मला केंद्र सरकारशी त्याविषयी बोलावे लागेल. केंद्र सरकारने बदलीचा आदेश जारी केल्याने आम्हाला शर्मा यांना गोव्याच्या सेवेतून मुक्त करावे लागेल; पण शेवटचा प्रयत्न म्हणून आपण केंद्रीय गृह मंत्र्यांशी या विषयावर अखेरचे बोलेन. शर्मा यांना गोव्याच्या सेवेत ठेवता येईल काय, याविषयी अखेरचा शब्द केंद्र सरकारकडे टाकून पाहिन. केंद्र सरकार जर बदलीबाबत ठाम राहिले, तर मग पर्याय नसेल. (खास प्रतिनिधी)