गोव्यातील विद्यार्थ्यांना अमली पदार्थांचा विळखा, समूळ उच्चाटन करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 02:50 AM2017-12-19T02:50:54+5:302017-12-19T02:51:04+5:30
राज्यातील विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात असून हायस्कूलपासून महाविद्यालयांपर्यंत या व्यसनांचा शिरकाव झाला आहे, अशी चिंता गोवा विधानसभेत सोमवारी व्यक्त करण्यात आली. पोलीस यंत्रणा याविरुद्ध कठोर आणि व्यापक कारवाई करण्यात अपयशी ठरत आहे, अशी टीका काँग्रेसच्या आमदारांनी केली. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी अमली पदार्थ व्यापाराचे गोव्यातून समूळ उच्चाटन करण्याची ग्वाही देत २०१८ साल हे अमली पदार्थविरोधी वर्ष म्हणून पाळण्याची घोषणा केली.
पणजी : राज्यातील विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात असून हायस्कूलपासून महाविद्यालयांपर्यंत या व्यसनांचा शिरकाव झाला आहे, अशी चिंता गोवा विधानसभेत सोमवारी व्यक्त करण्यात आली. पोलीस यंत्रणा याविरुद्ध कठोर आणि व्यापक कारवाई करण्यात अपयशी ठरत आहे, अशी टीका काँग्रेसच्या आमदारांनी केली. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी अमली पदार्थ व्यापाराचे गोव्यातून समूळ उच्चाटन करण्याची ग्वाही देत २०१८ साल हे अमली पदार्थविरोधी वर्ष म्हणून पाळण्याची घोषणा केली.
काँग्रेसचे आमदार प्रतापसिंग राणे यांनी या विषयावर लक्षवेधी सूचना मांडली होती. अमली पदार्थांच्या व्यवसायात गुंतलेल्या विदेशी व्यक्तींची त्यांच्या मायदेशात परत पाठवणी केली जावी, अशी मागणी राणे यांनी केली होती. ‘केवळ किरकोळ स्वरूपात अमली पदार्थांची विक्री करणाºयांनाच पोलीस अटक करतात.
जे मोठ्या प्रमाणात गोव्यात अमली पदार्थांचा साठा करून ठेवतात आणि त्याचा पुरवठा करतात, त्यांच्याविरोधात कारवाई होत नाही, असा आरोप भाजपचे आमदार मायकल लोबो या चर्चेप्रसंगी केला.