मुख्यमंत्र्यांचा झंझावात

By Admin | Published: March 16, 2015 01:36 AM2015-03-16T01:36:44+5:302015-03-16T01:43:30+5:30

पणजी : जिल्हा पंचायत निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची बनविली असून रविवारी मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण दिवस पेडणे तालुका प्रचारासाठी पिंजून

Chief Minister's storm | मुख्यमंत्र्यांचा झंझावात

मुख्यमंत्र्यांचा झंझावात

googlenewsNext

पणजी : जिल्हा पंचायत निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची बनविली असून रविवारी मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण दिवस पेडणे तालुका प्रचारासाठी पिंजून काढला. पार्से, कोरगाव येथे त्यांच्या मोठ्या जाहीर सभाही झाल्या. मगोच्या नेत्यांनीही नऊही जागांवर उमेदवार निवडून आणण्यासाठी कंबर कसली आहे.
मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पार्से, विर्नोडा, पोरस्कडे, तोरसे, हसापूर, नागझर, कोरगाव, पालये, हरमल, मोरजी, मांद्रे, आगरवाडा भागात दौरा केला. मोरजी मतदारसंघात पूर्वाश्रमीच्या मगोच्या नेत्या तसेच उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या मावळत्या उपाध्यक्षा श्रीमती मांजरेकर अपक्ष म्हणून रिंगणात उतरल्या आहेत. युतीचा भाजपचा अधिकृत उमेदवार येथे रिंगणात असतानाही मगोचे कट्टर कार्यकर्ते मांजरेकर यांच्यासाठी वावरत आहेत. जागा वाटपातील समझोत्यात मगोला कोणत्याही स्थितीत मोरजी मतदारसंघ आपल्याकडे यायला हवा होता; परंतु हा मतदारसंघ मुख्यमंत्र्यांचा असल्याने डाळ शिजली नाही.
केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनीही दोन दिवस गोव्यात राहून भाजप उमेदवारांचा प्रचार केला. मगो नेत्यांनीही प्रचारासाठी जोर लावलेला आहे. मगोचे दोन्ही मंत्री रविवारी दिवसभर प्रत्यक्ष फिल्डवर होते. वाहतूक तथा सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी मडकई, बांदोडा, उसगाव, केपे, सांताक्रुझ भागात दौरा केला. युती असली तरी सांताक्रुझ आणि चिंबल या दोन्ही मतदारसंघांमध्ये भाजपच्या एका नेत्याकडून मगो उमेदवारांच्या विरोधात काम चालू केल्याचे तसेच बाबूश मोन्सेरात
यांच्या उमेदवारांना तो समर्थन देत असल्याचे दिसून आले.
कारखाने, बाष्पकमंत्री दीपक ढवळीकर यांनी प्रियोळ, केरी-भूतखांब, खांडोळा, तिवरे, कुर्टी भागात रविवारी प्रचार केला. सांताक्रुझ तसेच अन्य काही ठिकाणी भाजप नेत्यांकडून होत असलेल्या फंदफितुरीबद्दल विचारले असता ते म्हणाले की, आमच्यासाठी ही परीक्षाच आहे. २0१७च्या विधानसभा निवडणुकीसाठी ही सेमीफायनल म्हणून आम्ही पाहतो. (प्रतिनिधी)
आणखी वृत्त पान ८, हॅलो १

Web Title: Chief Minister's storm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.