चीनच्या मंत्र्यांना गोव्यातील प्रकल्पांमध्ये रस!

By admin | Published: August 13, 2016 02:02 AM2016-08-13T02:02:14+5:302016-08-13T02:02:27+5:30

पणजी : गोव्यात साकारणाऱ्या इलेक्ट्रॉनिक सिटी व आयटी पार्क प्रकल्पांमध्ये चीनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री वांग यी यांनी रस दाखविला आहे,

Chinese ministers are interested in projects in Goa! | चीनच्या मंत्र्यांना गोव्यातील प्रकल्पांमध्ये रस!

चीनच्या मंत्र्यांना गोव्यातील प्रकल्पांमध्ये रस!

Next

पणजी : गोव्यात साकारणाऱ्या इलेक्ट्रॉनिक सिटी व आयटी पार्क प्रकल्पांमध्ये चीनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री वांग यी यांनी रस दाखविला आहे, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांना सांगितले.
गोवा भेटीवर आलेल्या वांग यी यांनी शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्री पार्सेकर यांची भेट घेतली व अनेक विषयांबाबत चर्चा केली. तुये येथे इलेक्ट्रॉनिक सिटी उभी राहणार आहे. तर चिंबल येथे आयटी पार्क साकारणार आहे. चीनमधून गोव्याच्या आयटी क्षेत्रात गुंतवणूक होऊ शकते, असे संकेत मुख्यमंत्री पार्सेकर व वांग यी यांच्या भेटीतून मिळाले.
येत्या आॅक्टोबरमध्ये गोव्यात ब्रिक्स परिषद होणार आहे. त्यानिमित्ताने चीनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री आले होते. ब्रिक्स परिषदेसाठी केंद्र सरकारने गोव्याची निवड केली ही अभिमानाची गोष्ट आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. इलेक्ट्रॉनिक सीटीमध्ये गुंतवणुकीसाठी वाव आहे. ब्रिक्स परिषदेनंतर गुंतवणुकीबाबत स्पष्टता येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. आम्ही गोव्याच्या आयटी क्षेत्रात चीनमधील गुंतवणुकीचे स्वागत करू. ब्रिक्ससाठीच्या तयारीची पाहणी करण्यासाठी वांग यी आले होते, असे पार्सेकर यांनी सांगितले.
चीनचे राष्ट्राध्यक्ष ब्रिक्स परिषदेत भाग घेणार आहेत. त्यामुळे वांग यी यांनी गोव्यात येऊन सुरक्षेच्या दृष्टीने व अन्य तयारीच्या दृष्टीने पाहणी केली.
(खास प्रतिनिधी)

Web Title: Chinese ministers are interested in projects in Goa!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.