नाताळ व नववर्षाचा फायदा घेऊन चिनी उत्पादने गोव्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2017 05:45 PM2017-12-13T17:45:24+5:302017-12-13T18:30:24+5:30

मडगाव : गोव्यात नाताळ आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला देशी आणि विदेशी पर्यटकांची भीड उसळत असल्याने या संधीचा फायदा घेऊन गोव्याच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात चिनी माल येण्याच्या तयारीत असताना, वजन आणि माप खात्याच्या अधिका-यांनी तसेच पोलिसांनी अशा मालांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

Chinese products taking advantage of Christmas and New Year in Goa | नाताळ व नववर्षाचा फायदा घेऊन चिनी उत्पादने गोव्यात

नाताळ व नववर्षाचा फायदा घेऊन चिनी उत्पादने गोव्यात

googlenewsNext

मडगाव : गोव्यात नाताळ आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला देशी आणि विदेशी पर्यटकांची भीड उसळत असल्याने या संधीचा फायदा घेऊन गोव्याच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात चिनी माल येण्याच्या तयारीत असताना, वजन आणि माप खात्याच्या अधिका-यांनी तसेच पोलिसांनी अशा मालांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मडगावात आज बुधवारी या दोन्ही खात्याने छापा मारून अंदाजे चार लाखांचा माल जप्त केला. यात डेकोरेटिव्ह माल तसेच चिनी सिगारेटींचा समावेश आहे.

मालभाट-मडगाव येथे वजन आणि माप खात्याने दोन दुकानांवर छापा टाकून तीन लाखांचा माल जप्त केला. वजन आणि माप खात्याचे अधिकारी अरुण पंचवाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली तर मडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कपिल नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चिनी बनावटीच्या सिगारेट जप्त केल्या.

मालभाट येथील साई एन्टरप्रायझर्सच्या दुकानांवर वजन आणि माप खात्याने छापा टाकला. या दुकानांमध्ये चिनी वीज उपकरणे, रोषणाईच्या वस्तू तसेच अन्य चिनी बनावटी वस्तू होत्या. पॅकेज कॉम्युडिटी गुडसच्या कायद्यांतर्गत या खात्याने ही कारवाई केली. जप्त केलेल्या मालांची उत्पादनाची तारीख तसेच अन्य आवश्यक बाबींचा उल्लेख नव्हता. ख्रिसमस सण जवळ येऊन ठेपल्याने बाजारपेठेत ग्राहकांची झुंबड उडाली आहे. स्वस्त दरात उपलब्ध असलेली चिनी मालाने बाजारपेठ व्यापली असून, ही उत्पादने ग्राहकांच्या माथी मारल्या जातात.

Web Title: Chinese products taking advantage of Christmas and New Year in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.