चॉकलेट, पेन चोरले; झाली शिक्षा, वृद्धाश्रमात समाजसेवा करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 11:50 AM2024-01-18T11:50:49+5:302024-01-18T11:51:01+5:30

परीक्षेनंतर वस्तू मागे तशाच सोडून देण्यात आल्या आहेत, असा दावा विद्यार्थ्यांनी केला. विद्यार्थ्यांनी वस्तू परत केल्या आणि माफी मागितली.

Chocolate, pens stolen; Sentenced, High Court directive to do social service in old age home | चॉकलेट, पेन चोरले; झाली शिक्षा, वृद्धाश्रमात समाजसेवा करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

चॉकलेट, पेन चोरले; झाली शिक्षा, वृद्धाश्रमात समाजसेवा करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

पणजी : गोव्यातील बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स पिलानी या संस्थेतील एका परिषदेदरम्यान पेन, बटाटा चिप्स, चॉकलेट्स, सॅनिटायझर, पेन, नोटपॅड, मोबाइल स्टँड, दोन डेस्क लॅम्प आणि तीन ब्लूटूथ स्पीकर आदी वस्तू चोरल्याबद्दल महाविद्यालयाने दोन विद्यार्थ्यांना परीक्षेस बसण्यापासून मज्जाव केला होता. हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात पोहोचल्यावर न्यायालयाने विद्यार्थ्यांना दिलासा देत दोन महिने दररोज २ तास समाजसेवा करण्याचे निर्देश दिले.

वस्तू परत करून मागितली होती माफी
परीक्षेनंतर वस्तू मागे तशाच सोडून देण्यात आल्या आहेत, असा दावा विद्यार्थ्यांनी केला. विद्यार्थ्यांनी वस्तू परत केल्या आणि माफी मागितली. संस्थने पाचही विद्यार्थ्यांना तीन सेमिस्टरसाठी नोंदणी करण्यापासून रोखले होते आणि प्रत्येकी ५०,००० रुपयांचा दंड ठोठावला होता.

संचालक का संतापले?
न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती एम. एस. सोनक यांच्या खंडपीठाने सोमवारी संस्थेचा हा निर्णय रद्दबातल ठरवला.  विद्यार्थ्यांच्या याचिकांवर सुनावणी करताना, कोर्टाने दोन वेळा आपला निर्णय पुढे ढकलला जेणेकरून संस्थेचे संचालक शिक्षेवर पुनर्विचार करू शकतील; पण तसे झाले नाही.  
विद्यार्थ्यांनी संस्थेच्या निर्णयाविरोधात न्यायालयीन हस्तक्षेप करण्याची मागणी करत याचिका दाखल करण्याची हिंमत दाखवली, त्यामुळे संचालक संतापले असे दिसते. याचिकाकर्त्यांना ५० हजारांच्या दंडासह विद्यार्थ्यांना माजोर्डा गावातील वृद्धाश्रमात समाजसेवा करण्याचे निर्देश कोर्टाने दिले.

Web Title: Chocolate, pens stolen; Sentenced, High Court directive to do social service in old age home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.