हवामान केंद्रित बहु-क्षेत्रीय सुविधा उपलब्ध करणार: मुख्यमंत्री 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2024 02:45 PM2024-02-21T14:45:03+5:302024-02-21T14:45:29+5:30

जागतिक बँकेकडून गोव्याला सवलतीत वित्त पुरवठा.

climate focused multi sectoral facility to be made available in goa said cm pramod sawant | हवामान केंद्रित बहु-क्षेत्रीय सुविधा उपलब्ध करणार: मुख्यमंत्री 

हवामान केंद्रित बहु-क्षेत्रीय सुविधा उपलब्ध करणार: मुख्यमंत्री 

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : कमी कार्बन उत्सर्जन आणि हवामान लवचिकतेच्या दृष्टिकोनातून गुंतवणुकीची अंमलबजावणी करण्यासाठी गोव्याला सवलतीच्या वित्त पुरवठ्यास जागतिक बँक सहकार्य करणार आहे. जागतिक बँकेच्या सहकार्याने राज्य सरकार हवामान केंद्रित बहु-क्षेत्रीय सुविधा उपलब्ध करणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

किनारी राज्यांत वेगाने तापमान वाढ होणाऱ्या हवामानाच्या प्रभावांना अधिक लवचिक करण्याच्या बाबतीत ही सुविधा मदत करील. वित्त सुविधेची घोषणा जागतिक बँकेच्या इंडिया क्लायमेट अँड डेव्हलपमेंट पार्टनर्स परिषद २०२४ च्या आवृत्तीत करण्यात आली. हवामान क्षेत्रातील विचारवंत आणि बदल घडवणारे दिग्गज या परिषदेत सहभागी झाले आहेत. ही परिषद २१ पर्यंत चालणार आहे. या परिषदेत मुख्यमंत्री सावंत बोलत होते.

मिश्रित वित्त सुविधा चौकटीद्वारे ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्रांची विस्तृत श्रेणी पाहता, गोवा सरकारच्या पर्यावरण विभागाने, कृषी आणि ग्रामीण विकास बँकचे उपाध्यक्ष जी. एस. रावत, एस. रामन यांच्यासमवेत यासंबंधी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. विद्यमान निधीसह प्रकल्पांना मदत करणे किंवा वित्तपुरवठा करण्यासाठी स्थापित व्यावसायिक व्यवहार्यता आणि विद्यमान निधी नसलेल्या प्रकल्पांना वित्तपुरवठा करणे, या गोष्टी केल्या जातील.

तंत्रज्ञान अन् हवामानाची सांगड

मुख्यमंत्री सावंत म्हणाले, संतुलित गोव्यासाठी लवचिकता हा आमच्यासाठी एक महत्त्वाचा पैलू आहे जो अर्थव्यवस्था आणि पर्यावरणाला जोडतो आणि आमच्या आकांक्षा उंचावतो. इकोसिस्टम आणि लोकांचा विकास व कल्याण याला आमचे प्राधान्य आहे. ही वित्त सुविधा आम्हाला आमच्या नियोजन, गुंतवणूक आणि पायाभूत सुविधांमध्ये अधिक लवचिकता अंतर्भूत आणि कार्यान्वित करण्यास सक्षम करील. आम्ही तंत्रज्ञान आणि बिझनेस मॉडेल्सच्या साहाय्याने सशक्त बनवण्यास उत्सुक आहोत जे आमच्या हवामान बदलाला प्रतिसाद देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतील.
 

Web Title: climate focused multi sectoral facility to be made available in goa said cm pramod sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.