नारळ काढण्यासाठी माडावर चढला असता, खाली पडल्याने जखमीचा मृत्यू
By सूरज.नाईकपवार | Published: December 16, 2023 04:38 PM2023-12-16T16:38:38+5:302023-12-16T16:39:19+5:30
नारळ काढण्यासाठी माडावर चढला असता, वरुन खाली पडल्याने जखमी हाेउन एका ५८ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला.
सूरज नाईकपवार, मडगाव: नारळ काढण्यासाठी माडावर चढला असता, वरुन खाली पडल्याने जखमी हाेउन एका ५८ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला.गोव्यातील दक्षिण गोव्यातील सुबदळे पाडी येथे वरील घटना घडली. गोविंद शाणु वेळीप असे मयताचे नाव असून, अनैसर्गिक मृत्यू म्हणून कुंकळ्ळी पोलिसांनी वरील प्रकरण नोंदवून घेतले आहे.
पोलिस निरीक्षक डायगो ग्रासियश यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कविता रावत पुढील तपास करीत आहेत.१५ डिसेंबर रोजी गोविंद माडावरुन खाली पडल्याने गंभीर जखमी झाला होता. नंतर त्याला तातडीने उपचारसाठी बाळ्ळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने नंतर गोमेकॉत हलविण्यात आले होते. शुक्रवारी तेथे त्याला मरण आले. संपूर्ण परिसरात या घटनेने हलहल व्यक्त करण्यात येत आहे.