मंत्री गावडेविषयी सभापतींनी मुख्यमंत्र्यांना जाब विचारावा, क्लाईड क्रास्टो यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2024 04:31 PM2024-02-04T16:31:11+5:302024-02-04T16:32:16+5:30
नारायण गावस पणजी: कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे हे अनेक वेळा भ्रष्टाचाराचे आरोपात सापडले आहे. तरीही मुख्यमंत्री डॉ. ...
नारायण गावस
पणजी: कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे हे अनेक वेळा भ्रष्टाचाराचे आरोपात सापडले आहे. तरीही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत त्यांचा बचाव करत आहेत. सभापती रमेश तवडकर यांनी त्यांच्यावर आरोप करुनही मुख्यमंत्री याची दखल घेत नाही. त्यामुळे ेसभापतींनी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांना या विषयी जाब विचारावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी केली आहे.
क्लाईड क्रास्टो म्हणाले, मंत्री गाेविंद गावडे यांनी कला व संस्कृती खात्याचा गैरफायदा घेत आपल्या काही काणकोण येथील संघटनांना सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठी निधी दिला पण तसेच सांस्कृतिक कार्यक्रम झाले नाहीत असा आरोप सभापती रमेश तवडकर यांनी केला आहे. सभापती तवडकर यांनी मंत्री गावडेवर आरोप केले आहेत तरी याची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काहीच दखल घेतली नाही. खासदार सदानंद तानावडे हा अंतर्गत मामला आहे असे सांगतात. पण हे पैसे जनतेचे आहे असे भ्रष्टाचार करु देणार नाही. या अगोदर कलाअकादमीचा छप्पर कोसळाला होता यावेळी मुख्यमंत्र्यांनी मंत्री गावडे यांचा बचाव केला होता. तसेच कलाअकादमीच्या बांधकामाच्या घोटाळ्या वेळीही बचाव केला आहे. आम्ही या सर्व प्रकाराची दक्षता खात्यामार्फत चौकशी करायची मागणी करतो. तसेच मुख्यमंत्र्यांनी मंत्री गाेविंद गावडे यांच्याकडून मंत्रीपद काढून घ्यावे, असे यावेळी क्लाईड क्रास्टो यांनी सांगितले.