आठशे पूरग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यास सुरूवात, मुख्यमंत्र्यांकडून आश्वासनांची पूर्तता
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2019 06:46 PM2019-08-27T18:46:10+5:302019-08-27T18:47:38+5:30
अलिकडेच आलेल्या पूरामुळे डिचोली, तिसवाडी, सत्तरी, पेडणो व बार्देश या पाच तालुक्यांमध्ये जास्त हानी झाली.
पणजी : राज्यातील चार तालुक्यांमधील बाराशेपैकी एकूण आठशे पुरग्रस्तांना सरकार दीड कोटी रुपयांची नुकसान भरपाई देणार आहे. या भरपाईचे वाटप मंगळवारी सुरू झाले. चतुर्थीपूर्वी लोकांना थोडी तरी मदत सरकार वितरीत करील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते, त्याचे पालन सुरू झाले आहे.
अलिकडेच आलेल्या पूरामुळे डिचोली, तिसवाडी, सत्तरी, पेडणो व बार्देश या पाच तालुक्यांमध्ये जास्त हानी झाली. लोकांच्या घरांचे नुकसान झालेच, शिवाय शेतीचीही प्रचंड हानी झाली. सरकार सध्या प्रत्येकाला किमान दहा हजार रुपयांचे अर्थसाह्य देत आहे. तसेच ज्यांची जास्त हानी झाली त्यांना एक लाखांचे अर्थसाह्य दिले जाते. मुख्यमंत्री आपत्कालीन निधीखाली सरकार मदत करत आहे.
पेडणोसह अन्य भागांमध्ये मंगळवारी काही प्रमाणात नुकसान भरपाईचे वाटप करण्यात आले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे मंगळवारी सायंकाळी येथील मिनेङिास ब्रागांझा संस्था सभागृहात एका कार्यक्रमासाठी आले होते. तिथे पत्रकारांनी त्यांना विचारले असता, ते म्हणाले की पहिल्या टप्प्यात दीड कोटींची नुकसान भरपाई वितरित केली जाईल. चार तालुक्यांमध्ये पूरग्रस्तांना मंगळवारी मदतीचे वितरण झाले.यापुढे शेतक:यांना वेगळी मदत दिली जाईल.
दरम्यान, महसुल मंत्री जेनिफर मोन्सेरात यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांनी तिसवाडी तालुक्यातील पूरग्रस्तांना मंगळवारी मदतीचे धनादेश वितरित केले. सचिवालयात याबाबतचा कार्यक्मर झाला. त्यावेळी उत्तर गोवा जिल्हाधिकारी आर. मनेका, अतिरिरिक्त जिल्हाधिकारी दशरथ रेडकर आदी उपस्थित होते. आम्ही कमी वेळेत मदतीचे हे वाटप केले आहे. जर कुणाला पुरात नुकसान होऊनही मदत मिळाली नसेल तर त्यांनी संबंधित अधिका:यांशी संपर्क साधावा, असे मुख्यमंत्री म्हणाले. ज्यांचे घर मोडले त्यांनी प्रधान मंत्री आवास योजना आणि अटल आश्रय योजनेखाली मदतीसाठी अर्ज करावेत, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.