Maharashtra Political Crisis: “निश्चितच!! बहुमत चाचणी सहजपणे पार करेन”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पूर्ण विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 05:23 PM2022-07-01T17:23:40+5:302022-07-01T17:24:43+5:30

Maharashtra Political Crisis: राज्यपालांनी नव्या सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे.

cm eknath shinde said definitely we have enough support and will win floor test in maharashtra vidhan sabha | Maharashtra Political Crisis: “निश्चितच!! बहुमत चाचणी सहजपणे पार करेन”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पूर्ण विश्वास

Maharashtra Political Crisis: “निश्चितच!! बहुमत चाचणी सहजपणे पार करेन”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पूर्ण विश्वास

Next

पणजी: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावरही राजकीय घडामोडींचा वेग कमी झालेला दिसत नाही. नव्या सरकारला बहुमत चाचणी सिद्ध करण्याचे आदेश राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी दिल्यानंतर आता विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. यासंदर्भातील हालचाली सुरू झाल्या असून, बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे गोव्याहून मुंबईत दाखल झाले. यावेळी दाबोळी विमानतळावर बोलताना, बहुमत चाचणी सहजपणे पार करू शकेन, असा विश्वस एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे रात्री उशिरा गोव्याला रवाना झाले. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांची बैठक घेतली. यानंतर ते आता पुन्हा मुंबईत आले आहेत. मुंबईला रवाना होत असताना दाबोळी विमानतळावर एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी, माझ्याकडे पुरेसे संख्याबळ आहे. हे निश्चित आहे की, बहुमत चाचणी सहजपणे पार करून शकेन, असे एकनाथ शिंदे यांनी नमूद केले. 

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस बंडखोरांना संबोधित करणार?

सुरुवातीला मिळालेल्या माहितीनुसार, २ आणि ३ जुलै रोजी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेण्यात येणार होते. मात्र, आता हे अधिवेशन ३ आणि ४ जुलै रोजी विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे सर्व बंडखोर आमदार तसेच शिंदे गटाला पाठिंबा दिलेले अपक्ष आमदार शनिवारी मुंबईत दाखल होणार आहे. शिवसेना बंडखोर आणि इतर अपक्ष आमदार मुंबईत दाखल झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमदारांना संबोधित करण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. 

दरम्यान, राज्यातील विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेत बंडाळी झाली. एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक आमदारांनी सूरत गाठले. त्यानंतर शिवसेनेतील बंडखोर आमदारांची संख्या वाढत गेली. सूरत सोडल्यानंतर शिंदे गट गुवाहाटीमधील हॉटेल रॅडिसनमध्ये थांबला होता. या ठिकाणी शिवसेनेचे ३९ आमदार आणि अपक्षांसह जवळपास ५० आमदार गुवाहाटीत होते. राज्यातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बंडखोर आमदारांनी गोव्यात जाण्याचा निर्णय घेतला आणि आता यानंतर सर्वजण मुंबईत दाखल होणार आहेत. 
 

Web Title: cm eknath shinde said definitely we have enough support and will win floor test in maharashtra vidhan sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.