'सीएम हेल्पलाइन' लोकांना भावली; कल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2024 08:48 AM2024-08-17T08:48:57+5:302024-08-17T08:49:20+5:30

कायम चालू राहावी अशी अपेक्षा

cm helpline start in goa spontaneous response to an idea  | 'सीएम हेल्पलाइन' लोकांना भावली; कल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद 

'सीएम हेल्पलाइन' लोकांना भावली; कल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद 

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : 'सीएम हेल्पलाइन' कल्पना लोकांना आवडली असून, या हेल्पलाइनच्या कल्पनेला चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. ९३१९८२८५८१ क्रमांकाची ही हेल्पलाइन सकाळी ९:३० पासून सायंकाळी ५:३० पर्यंत कार्यरत असून, कायम चालू राहावी, अशी अपेक्षा लोक व्यक्त करू लागले आहेत.

सोमवार ते शुक्रवार पाच दिवस ही हेल्पलाइन चालू असते व त्याव्दारे लोक पोलिस दल, वीज, समाजकल्याण, जलस्रोत, महिला व बालकल्याण, आरोग्य व सार्वजनिक बांधकाम या सात खात्यांशी निगडित आपल्या तक्रारी, अडचणी, समस्या मुख्यमंत्र्यांकडे मांडू शकतात. भरमसाठ रकमेचे वीज किंवा पाणी बिल, दयानंद सामाजिक सुरक्षा, गृह आधार आदी योजनांचे मानधन थकलेले असल्यास किंवा वरील कोणत्याही खात्यांशी संबंधित तक्रारी यावर करता येतील.

दरम्यान, सरकारचा सार्वजनिक गान्हाणी विभागही कार्यरत आहे. २०२३-२४ या गेल्या आर्थिक वर्षात २,५६७ पैकी १,३९१ तक्रारी निकालात काढल्याची अधिकृत माहिती या विभागाने दिली आहे. लाचखोरी, गैरव्यवहार, कर्मचाऱ्यांचा छळ, अर्जावर प्रक्रिया करण्यात किंवा परवाने जारी करण्यात विलंब, अत्याचार, पेन्शनशी संबंधित समस्या आणि सेवांचा दर्जा आदी तक्रारींचा यात समावेश आहे. दरम्यान, तक्रारींसाठी जीईएल सध्या अॅप डिझाइन करण्याच्या प्रक्रियेत असल्याचेही सांगण्यात येते.
 

Web Title: cm helpline start in goa spontaneous response to an idea 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.