सावंत-राणे मनोमिलन गरजेचे; कोअर टीमच्या अनेक सदस्यांची भावना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2024 09:36 AM2024-10-02T09:36:45+5:302024-10-02T09:37:47+5:30
नोकरभरतीचा मुद्दा ठरला नाजूक, लोकमत'ने दिले होते सर्वप्रथम २७ सप्टेंबर रोजी वृत्त...
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गोव्यात तूर्त नेतृत्वबदल किंवा मंत्रिमंडळ फेररचना होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दिल्लीत सोमवारी रात्री मुख्यमंत्री प्रमोद सावंत व आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची श्रेष्ठींसोबतची बैठक यशस्वी झाली आहे. मात्र दोन्ही नेत्यांमध्ये मनोमिलन झाले की नाही हे कदाचित महाराष्ट्र व गोवाप्रश्नी दिल्लीत एकत्र बैठक होणार वादांचे विषय पोहोचले श्रेष्ठींपर्यंत, तीन नेत्यांना निमंत्रण शक्य; कर्मचारी निवड आयोग कळीचा मुद्दा अन्य राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतरच्या काळात कळून येईल. सावंत व राणे यांच्यात मनोमिलन होणे भाजपच्या हिताच्यादृष्टीने गरजेचे अशी भावना कोअर टीमच्या काही सदस्यांमध्ये व्यक्त होत आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नडा, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष या बैठकीला उपस्थित होते. श्रेष्ठींनी दोघांनाही सोमवारी दिल्लीला बोलावून घेतल्याने नेतृत्वबदल तसेच मंत्रिमंडळ फेररचनेच्या प्रश्नावरून राजकीय वर्तुळात हा विषय चर्चेचा ठरला होता.
मुख्यमंत्री सावंत व राणे यांच्यातील संघर्ष टोकाला पोचल्याने दोघांनाही सोमवारी तातडीने दिल्लीत बोलावून घेण्यात आले. श्रेष्ठींनी दोघांचेही म्हणणे ऐकून घेतले. बैठकीत मुख्यमंत्र्यांनी व राणे यांनी काही मुद्दे मांडले. भुतानीसह मेगा प्रकल्पांसबंधी चालू असलेली आंदोलने, रेंगाळलेली नोकरभरती आदी विषयांवर चर्चा झाली. कर्मचारी भरती आयोगाबाबतही चर्चा झाली. दोघांनाही मतभेद संपवा आणि चांगल्या पद्धतीने काम पुढे न्या, असा सल्ला श्रेष्ठींनी दिला आहे.
मुख्यमंत्र्यांनी नोकरभरती राज्य कर्मचारी निवड आयोगामार्फतच करण्याचा घेतलेला निर्णयही कळीचा मुद्दा ठरला. शाह यांच्यासमोर विश्वजित यांनी या गोष्टीला विरोध करून नोकरभरती खात्यांतर्गतच व्हायला हवी, अशी मागणी केली. श्रेष्ठींनीही खात्यांतर्गतच नोकरभरती करण्याबाबत शिक्कामोर्तब केले आहे की नाही हे पुढील काळात स्पष्ट होईल. 'लोकमत'ने राणे यांना याविषयी विचारले असता, त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही.
यापुढे संघर्ष नको...
दिल्लीतील भेटीबद्दल दोघांनीही कोणतीही माहिती उघड करण्याचे टाळले. मात्र मंत्री सावंत व राणे यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली व आता यापुढे संघर्ष कायम संपावा, असे भाजप कोअर टीमच्या काही सदस्यांना वाटते. दोघांचे मनोमिलन व्हावे असे कार्यकर्त्यांनाही वाटते. या दोघांमधील वाद कायमचा संपणे कठीण याची कल्पना केंद्रीय नेतृत्वालाही आलेली आहे.
कार्यकर्ते जोशात
दरम्यान, तूर्त कोणताही नेतृत्वबदल होणार नाही, हे दिल्लीतील भेटीनंतर स्पष्ट झाल्याने मुख्यमंत्र्यांचे कार्यकर्ते, समर्थक जोशात आहेत. या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर मुख्यमंत्र्यांचे धैर्य उंचावण्यासाठी 'भिवपाची गरज' ना मोहीम सुरू केली आहे.
सरदेसाईंचा हल्लाबोल
दरम्यान, गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना असे म्हटले आहे की, 'सरकारमधील दोन नेत्यांमधील संघर्षांचा विषय दिल्लीपर्यंत पोचला. एका बाजूने राज्यात धार्मिक सलोखा बिघडण्याची स्थिती निर्माण झाली असताना दुसरीकडे सत्तेतील दोन नेत्यांमधील वाद शिगेला पोचला आहे. या गोष्टींचा राज्यातील पर्यटन हंगामावर परिणाम होणार आहे.