'मोदीयालॉग' पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांहस्ते प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2024 10:20 IST2024-12-27T10:18:01+5:302024-12-27T10:20:32+5:30
मोदी यांनी स्थानिक तसेच जागतिक प्रेक्षकांना 'मन की बात' मधून दिलेल्या संदेशांचा या पुस्तकात समावेश आहे.

'मोदीयालॉग' पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांहस्ते प्रकाशन
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: हळदोणे येथील आश्विन फर्नांडिस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' कार्यक्रमावर आधारित लिहिलेले 'मोदीयालॉग: कन्व्हर्सेशन फॉर विकसित भारत' या पुस्तकाचे लोकार्पण गुरुवारी (दि.२६) मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.
मोदी यांनी स्थानिक तसेच जागतिक प्रेक्षकांना 'मन की बात' मधून दिलेल्या संदेशांचा या पुस्तकात समावेश आहे. उद्घाटनाच्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, 'केंद्रीय कृषी आणि ग्रामविकासमंत्री शिवराज सिंह चौहान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांच्यासमवेत मी देखील या पुस्तकात माझे मत व्यक्त केले आहे. विकसित भारतासाठी भारताच्या दृष्टिकोनाला आकार देण्यासाठी प्रासंगिकतेवर भर देतात.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदीजी 'मन की बात'च्या माध्यमातून विकसित भारताकडे नेणाऱ्या सकारात्मक गोष्टी सांगतात. महिन्यातून एकदा लोकांशी अशा प्रकारे संवाद साधणारे मोदी हे देशाचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. गेल्या ७५ वर्षात असे कुठल्याच पंतप्रधानांनी केले नाही. गोव्याचे सुपुत्र अश्विन फर्नांडिस यांनी हे पुस्तक लिहिल्याबद्दल आणि लोकांपर्यंत पोहोचवल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन केले.