कर्नाटकात पुन्हा भाजपचीच सत्ता!; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 10:43 AM2023-02-10T10:43:40+5:302023-02-10T10:44:53+5:30

म्हादईच्या प्रश्नावर गोवा व कर्नाटक यांच्यात वाद चालू असताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कर्नाटकात भाजपचेच सरकार पुन्हा सत्तेवर येईल, असे विधान केले आहे.

cm pramod sawant said bjp will in power again in karnataka | कर्नाटकात पुन्हा भाजपचीच सत्ता!; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे विधान

कर्नाटकात पुन्हा भाजपचीच सत्ता!; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे विधान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: म्हादईच्या प्रश्नावर गोवा व कर्नाटक यांच्यात वाद चालू असताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कर्नाटकात भाजपचेच सरकार पुन्हा सत्तेवर येईल, असे विधान केले आहे. मंगळुरू येथे कॅनरा कल्चरल अकादमीच्या उद्घाटन कार्यक्रमात ते. आगामी विधानसभा निवडणुकीत कर्नाटकात पुन्हा भाजपची सत्ता येईल आणि केंद्रात व राज्यात पुन्हा डबल इंजिन सरकार स्थापन होईल, असे ते म्हणाले.

विशेष म्हणजे कर्नाटकने कळसा भांडुरा प्रकल्पाच्या डीपीआरला केंद्राकडून मंजुरी मिळवताना गोव्याची जीवनदायिनी म्हादईचे पाणी पळविले असतानाही त्यावर मुख्यमंत्र्यांनी चकार शब्दही काढला नाही. न्यू कर्नाटकच्या आशा आकांक्षा डबल इंजिन सरकारच पूर्ण करू शकेल, असे ते म्हणाले.

२०२० च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवभारत निर्माण करण्याचे स्वप्न पूर्ण करता येईल. युवा वर्गाला नजरेसमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'क्लिन इंडिया ते फिट इंडिया' असे अनेक कार्यक्रम राबवले आहेत. कौशल्य विकासासाठी नवे अभ्यासक्रम आणले आहेत. सर्व शैक्षणिक संस्थांनी हे अभ्यासक्रम लागू करावेत, असेही ते म्हणाले.
मंगळुरू येथे मुख्यमंत्र्यांनी कोकणी भाषिकांसाठी सेंटर फॉर एक्सलन्सचे उद्घाटन केले. विश्व कोकणी समारोहानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन केले होते. कोकणीचा आठव्या परिशिष्टात समावेश केल्यानंतर या भाषेची लोकप्रियता वाढली आहे, असेही मुख्यमंत्री सावंत म्हणाले. 

सरदेसाईंकडून टीका

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी मंगळुरु येथे केलेल्या विधानावर गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी टीका केली असून, या सरकारला राज्य निष्ठेपेक्षा पक्षनिष्ठा महत्त्वाची. तसेच म्हादईपेक्षा सत्ता महत्त्वाची असल्याचे स्पष्ट झाल्याचे म्हटले आहे.

गोवा ते मंगळुरू 'वंदे भारत' रेल्वे

मंगळुरूहून परतल्यानंतर गोव्यात पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, लवकरच केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून गोवा-मंगळुरु 'वंदे भारत' रेल्वे सुरु करण्याची मागणी सरकार करणार आहे. सर्व रेल्वे कोचमध्ये वाय-फाय कनेक्टिव्हिटी असावी, अशीही मागणी केली जाईल. मोपाहून मंगळुरु विमानसेवा सुरु करण्यासाठीही प्रयत्न करू, मुख्यमंत्र्यांनी मंगळुरूहून गोवा प्रवास नेत्रावती एक्स्प्रेसने केला. त्यावेळी वायफाय कनेक्टिव्हिटी नसल्याने त्यांना अडचणी आल्या.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: cm pramod sawant said bjp will in power again in karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.