गोव्यात मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात बोगस मतदारांचा सुळसुळाट,काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2017 12:37 PM2017-10-25T12:37:24+5:302017-10-25T12:37:55+5:30
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या पणजी मतदारसंघात बोगस मतदारांची फौज तयार ठेवण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते गिरीष चोडणकर यंनी केला असून मुख्य निवडणूक आयुक्तांकडे या प्रकरणात तक्रार करण्यात आली आहे.
पणजी- मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या पणजी मतदारसंघात बोगस मतदारांची फौज तयार ठेवण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते गिरीष चोडणकर यंनी केला असून मुख्य निवडणूक आयुक्तांकडे या प्रकरणात तक्रार करण्यात आली आहे.
गोव्याची राजधानी असलेल्या पणजी मतदारसंघातून मुख्यमंत्री पोटनिवडणुकीत निवडून आले होते. त्या मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 10, 14, 15, 16 आणि 18 मध्ये बोगस मतदार मोठ्या प्रमाणात आढळून आल्याचा दावा चोडणकर यांनी केला आहे. कागदपत्रांसह याची निवडणूक आयोगाला सादर करून तक्रार नोंदविण्यात आली आहे. या प्रकरणात लक्ष्य घालून आोयोगाने बोगस मतदारांना वगळण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.
हे बोगस मतदार पणजीत विविध ठिकाणी असलेल्या सरकारी सदनिकेत राहणारे लोक आहेत. त्यांना बेकायदेशीरपणे आणि केळ स्वार्थासाठी पणजीत मतदानाचे अधिकार देण्यात आले आहेत. मागील पोटनिवडणूकीत मुख्यमंत्री पर्रीकर या मतदारसंघातून निवडून आले तेव्हाही या बोगस मतदारांन मततान देल्याचे मतदान केंद्रांवरील नोंदीत सापडत असल्याची माहिती त्यांनी दिली. या निवडणुकीत स्वतः चोडणकर हे काँग्रेसचे उमेदवार म्हणून लढले होते.