समुदायाच्या पाठिंब्याने डेंग्यूच्या ९० टक्के तक्रारी होऊ शकतात कमी : डॉ. कल्पना महात्मे 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 05:00 PM2024-05-13T17:00:29+5:302024-05-13T17:00:40+5:30

डॉ. महात्मे म्हणाल्या, दरवर्षी डेंग्यूच्या रुग्णांच्या वाढत्या आलेखामुळे  आम्ही  या वर्षी मान्सून येण्याआधीच डेंग्यूच्या संकटाचा सामना करण्यासाठी काम सुरु केले आहे.

Community support can reduce 90 percent of dengue cases: Dr. Kalpana Mahatma | समुदायाच्या पाठिंब्याने डेंग्यूच्या ९० टक्के तक्रारी होऊ शकतात कमी : डॉ. कल्पना महात्मे 

समुदायाच्या पाठिंब्याने डेंग्यूच्या ९० टक्के तक्रारी होऊ शकतात कमी : डॉ. कल्पना महात्मे 

पणजी (नारायण गावस ):डेंग्यूवर नियंत्रण मिळवायचे असेल तर समुदायाचा पाठिंबा गरजेचा आहे. समुदायाचा पाठिंबा  मिळाला  तर ९० टक्के डेंग्यू मलेरियाच्या तक्रारी कमी होऊ शकतात. यंदा डेंग्यू जागृती थीम ही डेंग्यू नियंत्रणासाठी समुदायाला जोडा अशी असल्याने आम्ही विविध धार्मिक संस्थांना जागृतीसाठी आवाहन केले आहे, असे आरोग्य खात्याच्या वरिष्ठ अधिकारी डॉ. कल्पना महात्मे यांनी सांगितले 

डॉ. महात्मे म्हणाल्या, दरवर्षी डेंग्यूच्या रुग्णांच्या वाढत्या आलेखामुळे  आम्ही  या वर्षी मान्सून येण्याआधीच डेंग्यूच्या संकटाचा सामना करण्यासाठी काम सुरु केले आहे. या लढाईत स्थानिक समुदायाने सहभागी करून घेण्याचाही त्यांनी निर्णय घेतला आहे.  नुकतेच   आम्ही पणजी आणि सांतीनेज येथील रहिवासी धर्मगुरूंशी संपर्क साधला आणि रविवारच्या धार्मिक सेवांदरम्यान डासांची उत्पत्ती तपासण्यासाठी आणि डेंग्यूचा सामना करण्यासाठी काय करावे आणि करू नये याबद्दल घोषणा करण्याची विनंती केली.

डॉ कल्पना महात्मे म्हणाल्या, आम्ही मशिदींमध्ये अशाच घोषणा करण्यासाठी मुस्लिम धार्मिक नेत्यांशी संपर्क साधला आहे. तसेच मंदिर व्यवस्थापनाशीही संपर्क साधण्यात आला आहे, परंतु हिंदू समुदायाऐवजी वैयक्तिकरित्या उपासना करतात त्यामुळे चर्च आणि मशिदींमध्ये जशा घोषणा प्रभावी ठरू शकतात तशा इथे ठरत नाहीत.

डॉ. महात्मे म्हणाल्या, यंदा डेंग्यू नियंत्रणासाठी सरकारी  खात्याच्या विविध नाेडल अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे.  तसेच खात्याने आता कदंब महामंडळ औद्योगिक विकास महामंडळ, कॅप्टन ऑफ पोर्ट, शिक्षण खाते, सोसायटी रजिस्टर यांना आपआपल्या खात्यात डेंग्यू नियंत्रण करण्यासाठी सुचना दिल्या आहेत.

महात्मे म्हणाल्या,गेल्या वर्षी आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांकडून संपूर्ण राज्यात आमची जागरूकता आणि डास उत्पत्ती प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठी आम्हाला कर्मचारी पुरवण्यासरखी लक्षणीय मदत मिळाली.  जर आपल्याला डेंग्यूला आळा घालायचा असेल आणि अखेरीस त्याला दूर करायचा असेल तर स्थानिक समुदायाने (लोकांनी) आमच्या या प्रयत्नांमध्ये सामील होण्याची गरज आहे. दरम्यान, नागरी आरोग्य केंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि सामुदायिक आरोग्य केंद्रांच्या प्रभारी डॉक्टरांना डेंग्यू आणि मलेरियाचा सामना करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना आधीच देण्यात आल्या आहेत. 

अनेक वस्त्यांमध्ये आणि शहरी भागात जेथे निवासी इमारती आणि संकुले विपुल प्रमाणात आहेत तेथे घरांमध्ये साठलेल्या पाण्यात डासांची पैदास होते, फुलांच्या कुंड्यांखालील बेसप्लेट आणि काहीवेळा न वापरलेल्या कमोडमध्ये देखील डासांची पैदास होते.त्यामुळेअसे उरलेले पाणी चार आठ दिवसांतून किमान एकदा तरी साफ केले जायला हवे असेही महात्मे म्हणाल्या.

Web Title: Community support can reduce 90 percent of dengue cases: Dr. Kalpana Mahatma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.