भाजप आमदार व प्रवक्त्यावर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्षाकडून पोलिसांत तक्रार
By सूरज.नाईकपवार | Published: June 13, 2024 05:38 PM2024-06-13T17:38:12+5:302024-06-13T17:39:11+5:30
गोव्यात मणिपूरसारखी स्थिती करायची आहे का असा सवाल त्यांनी केला आहे.
सूरज नाईकपवार / मडगाव
मडगाव: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर गोव्यात भाजप ख्रिस्ती धर्मगुरुंवर निशाणा साधून गोव्यातील धार्मिक सलोखा भाजपा बिघडवू बघतो असा आरोप करुन काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरिश चोडणकर यांनी मडगाव पोलिस ठाण्यात भाजपचे प्रवक्ते गिरिराज पै. वेर्णेकर व आमदार संकल्प आमोणकर यांच्याविरोधात मडगाव पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.या दोन्ही नेत्यांनी बुधवारी राजधानी पणजीत पत्रकार परिषद घेतली होती. त्यात ख्रिस्ती धर्मगुरुवर टिप्पणी केली होती. यापुर्वी राज्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनीही अशीच भाषा वापरली होती. भाजपकडे सत्ता होती. जर त्यांना या गोष्टी माहिती होत्या तर त्यांनी पुर्वीच कारवाई का केली नाही. आता पराभव झाल्यानंतर त्याचे खापर ख्रिस्ती धर्मगुरुवर थापले जाते.अशा कृत्यातून गोव्यात मणिपूरसारखी स्थिती करायची आहे का असा सवाल त्यांनी केला आहे.
गोव्यातील धार्मिक सलोखा बिघडविण्याचे हे कारस्थान आहे. चर्चने प्रत्येक निवडणुकीत आपली भुमिका घेतलेली आहे. ज्यावेळी फायदा होतो त्यावेळी भाजप गप्प बसतात. आपल्या उमेदवाराचा का पराभव झाला याचे आत्मपरिक्षण त्या पक्षाने खरे तर करायची गरज आहे. ते न करता पराभवाचे खापर ख्रिस्ती धर्मगुरुवार फोडले जात आहे. भाजपचा केडर तसेच बहुजन समाज त्यांच्यापासून दूर का गेला हो बघावे असे चोडणकर म्हणाले.
वेर्णेकर व आमोणकर या दोघांवर भादंसंच्या १५३ (अ) व २९५ (अ) कलमाखाली गुन्हा नोंद करुन कारवाई करावी अशी मागणी त्यांनी आपल्या तक्रारीत केली आहे.