गोव्यात विरोधकांविरूद्ध गुन्हे नोंदविण्याचा धडाका

By admin | Published: June 27, 2016 05:41 PM2016-06-27T17:41:12+5:302016-06-27T17:41:12+5:30

सरकारच्या विविध तपास एजन्सीकडून हल्ली गुन्हे दाखल करण्याचा सपाटा चालविला असून नोंदविण्यात आलेले बहुतेक गुन्हे हे भाजप सरकारचे राजकीय विरोधकांविरुद्ध आहेत.

The complaint of crime against opponents in Goa | गोव्यात विरोधकांविरूद्ध गुन्हे नोंदविण्याचा धडाका

गोव्यात विरोधकांविरूद्ध गुन्हे नोंदविण्याचा धडाका

Next
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि.२७ -  सरकारच्या विविध तपास एजन्सीकडून हल्ली गुन्हे दाखल करण्याचा सपाटा चालविला असून नोंदविण्यात आलेले बहुतेक गुन्हे हे भाजप सरकारचे राजकीय विरोधकांविरुद्ध आहेत. हे निवडणुकीचे वर्ष असल्या कारणाने हा केवळ योगायोग असे मानायला या प्रकरणात अडकलेले लोक तयार नसून हा राजकीय डाव असल्याचा आरोप सर्वांनी केला आहे. 
राजकीय व्यक्तींविरुद्ध गुन्हे नोंदविण्याचे प्रकार हल्लीच्या १५ दिवसांच्याकाळात वाढले असून एका मागून एक असे अर्घे डजन गुन्हे नोंदविण्यात आले. माजीमंत्री आणि कॉंग्रेस नेते चर्चिल आलेमाव, माजीमंत्री आणि कॉंग्रेसचे आणखी एक नेते नीळकंठ हळर्णकर, जीसीएचे पदाधिकारी चेतन देसाई, विनोद फडके आणि अकबर मुल्ला यांच्यावर गुन्हे नोंदविण्यात आले. सर्व पैकी सर्वच जणांनी राजकीय हेतूने आपल्यावर कारवाई करण्यात आल्याचे व आपली कारकीर्द डागाळण्याच्या हेतुने गुन्हे नोंदविले असल्याचे म्हटले आहे. 
टाकी घोटाळा प्रकरणात चर्चिलवर गुन्हा दाखल करण्याबद्दल  फारसी हरकत नसावी, परंतु फार जुन्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी एसीबीला आताच वेळ मिलाला का हा प्रश्न उपस्थत आहेत. भाजप विरोधात असताना तत्कालीन आमदार दामोदर नाईक यांनी हा विषय विधानसभेत उपस्थित केला होता. त्यानंतर कॉंग्रेस सरकार जाऊन भाजप सरकार सत्तेवर आले. भाजप सरकारचाही कार्यकाल संपत आला आणि अखेरच्या वर्षात गुन्हा दाखल करण्याची आठवण का झाली या प्रश्नाचेही उत्तर देणे आवश्यक आहे. त्यामुळे आपल्याला राजकीय दृष्ट्या संपविण्याचा हा कट असल्याचा चर्चिलचा आरोप दुलक्ष करण्यासारखा नाही. 
गृहनिर्माण मंडळाच्या भुखंड घोटाळा प्रकरणातही गुन्हा दाखल करण्याचे शहाणपण भ्रष्टाचारविरोधी विभागाला उशिराच सुचले. त्यात नीळकंठ हळर्णकर आणि सनदी अधिकारी एल्वीस गोम्स यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हळर्णकर यांनी नुकताच कॉंग्रेस प्रवेश केला आहे आणि एल्वीस हे नोकरीचा राजीनामा देऊन आम आदमी पार्टीत प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत आणि आम आदमी पार्टीचे पदाधिकारीही या वृत्ताला दुजोरा देत आहेत.
गृहनिर्माण महामंडळ भुखंड घोटाळा प्रकरणात गुन्हा नोंदविताना ठराविक मामसामनाच संशयित म्हणून लक्ष करण्यात आल्याचा आरोपही आता होवू लागले आहेत. या प्रकरणात आणखीही बडी मंडळी गुंतलेली असताना आणि प्राथमिक तपासातून तो उघड झाला असताना केवळ ठराविक माणसावरच गुन्हा दाखल करून राजकीय सूड उगविण्याचा हा डाव असल्याचे आरोपही चर्चिलसह इतर मंडळीने केले आहेत.

 

Web Title: The complaint of crime against opponents in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.