‘ब्रिक्स’ पर्यावरण परिषदेत वायू, जल प्रदूषणावर चिंता

By admin | Published: September 17, 2016 02:13 AM2016-09-17T02:13:31+5:302016-09-17T02:17:33+5:30

मडगाव : जगभरात वाढत्या प्रदूषणामुळे पिण्याच्या शुद्ध पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असल्याच्या पार्श्वभूमीवर ब्राझिल, रशिया, भारत, चीन

Concerns about gas, water pollution in 'BRICS' Environment Conference | ‘ब्रिक्स’ पर्यावरण परिषदेत वायू, जल प्रदूषणावर चिंता

‘ब्रिक्स’ पर्यावरण परिषदेत वायू, जल प्रदूषणावर चिंता

Next

मडगाव : जगभरात वाढत्या प्रदूषणामुळे पिण्याच्या शुद्ध पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असल्याच्या पार्श्वभूमीवर ब्राझिल, रशिया, भारत, चीन व दक्षिण आफ्रिका हे पाच ‘ब्रिक्स’ देश एकत्र आले असून या देशांतील नद्यांचे शुद्धीकरण हे या परिषदेचे प्रमुख लक्ष्य बनले आहे. ‘ब्रिक्स’ची पर्यावरण परिषद कासावली येथे पार पडली. या दोन दिवसांच्या परिषदेत पाण्याच्या वाढत्या प्रदूषणाबरोबरच हवामान बदलामुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांवर गंभीरतेने चर्चा करण्यात आली.
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचे राज्यमंत्री अनिल दवे यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या पाचही देशांचे पर्यावरणमंत्री व इतर महत्त्वाचे पदाधिकारी सध्या गोव्यात जमले असून शुक्रवारी या दोन दिवसांच्या परिषदेचा समारोप झाला. पर्यावरणीय समस्यांवर नियंत्रण आणण्यासाठी या पाचही देशांत समझोता करार झाला असून पाचही देश एकमेकांच्या साहाय्याने या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करतील, असे दवे यांनी सांगितले.
पाणी व हवेतील प्रदूषण, जागतिक हवामान बदल, सक्षम कचरा व्यवस्थापन आणि जैवविविधतेचे संवर्धन या चार मुद्द्यांवर या परिषदेत गंभीरतेने चर्चा झाली. या समस्यांवर नियंत्रण आणण्यासाठी पाचही देश तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करणार असून यासंबंधी येत्या एप्रिल महिन्यात चीनमध्ये तंत्रज्ञांची एक बैठक होणार असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय नोव्हेंबर महिन्यात या पाचही देशांचे मंत्री मोरोक्को येथे पुन्हा जमणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Web Title: Concerns about gas, water pollution in 'BRICS' Environment Conference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.