राहुल गांधींच्या विधानाचा निषेध; काँग्रेसने समाजात तेढ वाढवल्याची मुख्यमंत्र्यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2024 07:50 AM2024-03-20T07:50:43+5:302024-03-20T07:51:10+5:30

आगामी लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी आणि इंडिया आघाडीला सनातनी शक्ती रूपच त्यांची खरी जागा दाखवेल.

condemnation of rahul gandhi statement cm pramod sawant criticism that congress has increased rift in the society | राहुल गांधींच्या विधानाचा निषेध; काँग्रेसने समाजात तेढ वाढवल्याची मुख्यमंत्र्यांची टीका

राहुल गांधींच्या विधानाचा निषेध; काँग्रेसने समाजात तेढ वाढवल्याची मुख्यमंत्र्यांची टीका

लोकमत न्यूज नेटवर्क हणजूण: 'इंडिया अलायन्स ही आघाडी शक्तीचा विनाश करण्यासाठी आहे' असे विधान राहुल गांधी यांनी नुकतेच मुंबई येथे केले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी बंदीरवाडा-हणजूण येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या विधानाचा निषेध केला.

पत्रकार परिषदेत बोलताना केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले की, 'राहुल गांधी समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. सनातन हिंदू धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे सनातन हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या आहेत. सनातनी हिंदू धर्म हा शक्तिपीठाचे उपासक आहेत. संपूर्ण विश्व चालवणारी अदृश्य शक्ती असून सनातन धर्मीय त्यांना मानते. अशा शक्तीची राहुल गांधी यांनी थट्टा केली. त्याचा सर्व हिंदू निषेध करीत आहेत.'

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, देशात शक्ती हे भक्तीचे स्थान आहे. हिंदू धर्मीयांचे अनेक शक्तिपीठे आहेत. हिंदू धर्मीयांच्या देवता या शक्तीच आहेत. नारीशक्ती युवाशक्ती याही एक प्रकारच्या शक्तीच आहेत. शक्तीरुपी नारींचा आशीर्वाद भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी आणि इंडिया आघाडीला सनातनी शक्ती रूपच त्यांची खरी जागा दाखवेल.

 

Web Title: condemnation of rahul gandhi statement cm pramod sawant criticism that congress has increased rift in the society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.