सोनसडो कचरा प्रश्नावरुन मडगाव पालिका आणि सरकारमध्ये संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 09:32 PM2019-09-20T21:32:53+5:302019-09-20T22:18:32+5:30

मडगावच्या कचऱ्यावरुन आतार्पयत अनेकवेळा मडगाव पालिका आणि राजकारणी यांच्यातील संबंध ताणण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.

Conflict between the Municipal Corporation and Government over the Sonsodo question | सोनसडो कचरा प्रश्नावरुन मडगाव पालिका आणि सरकारमध्ये संघर्ष

सोनसडो कचरा प्रश्नावरुन मडगाव पालिका आणि सरकारमध्ये संघर्ष

Next

मडगाव: मडगावच्या कचऱ्यावरुन आतार्पयत अनेकवेळा मडगाव पालिका आणि राजकारणी यांच्यातील संबंध ताणण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मडगावची ही समस्या जटील होण्यामागे मडगाव पालिकेचीच अवस्था कारणीभूत असल्याचा आरोप घनकचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी केला आहे. मडगावच्या नगराध्यक्षा बबिता प्रभुदेसाई यांनी त्यांना मडगावची चिंता करण्यापेक्षा तुमच्या कळंगूटचीच जास्त चिंता करा असा सल्ला दिल्याने पालिका आणि सरकार यांच्यात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मायकल लोबो यांनी काल गुरुवारी मडगावात आले असता मडगावची कचरा समस्या सोडविण्यासाठी मडगाव पालिका असमर्थ ठरली आहे. या पालिकेवर निवडून आलेल्या सदस्यांनी मडगावकरांना सोनसडय़ावरील कचरा साफ करण्याचे आश्र्वासन दिले होते. मात्र हे नगरमंडळ ते पाळू शकले नाही अशी टीका केली होती. या पाश्र्र्वभूमीवर प्रभूदेसाई यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन लोबो यांनी मडगाव व फातोर्डाची चिंता करण्याऐवजी सध्या जागतिक पर्यटन नकाशावर बदनाम होणाऱ्या आपल्या कळंगूटचीच आधी चिंता करावी असा टोला हाणला. वाढत्या वेश्या व्यवसायामुळे सध्या कळंगूट बदनाम झाले आहे. लोबो यांनी ही समस्या आधी दूर करावी अशी प्रतिक्रिया प्रभूदेसाई यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

सोनसडो येथे मडगावचा कचरा टाकला जातो तेथे कचऱ्याचा डोंगर उभा झाला आहे. यासाठी लोबो यांनी मडगाव पालिकेला दोष दिला होता. यापूर्वी हा कचऱ्याचा डोंगर 70 हजार टन होता तो कचरा  आता वाढून 2.25 लाख टन झाला आहे. कचऱ्यावर प्रक्रिय़ा  न करता तो थेट तेथे टाकत असल्यामुळेच कचऱ्याच्या राशी वाढतात असे लोबो म्हणाले होते. त्याला उत्तर देताना प्रभूदेसाई म्हणाल्या, मडगावातील कचऱ्याची समस्या बिकट होण्यासाठी मडगाव पालिका जबाबदार नसून फोमेन्तो कंपनीकडून असहकार्य मिळाल्यामुळेच आम्ही ही समस्या दूर करु शकलो नाहीत. मडगावच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आम्ही मडगावात घरोनघर जाऊन कचरा गोळा करण्याची मोहीम सुरु केली होती. एवढेच नव्हे तर कचऱ्याचे वर्गीकरणही सुरु केले होते. मात्र आम्हाला फोमेन्तोकडून योग्य ते सहकार्य न मिळाल्यानेच ही समस्या बिकट झाल्याचे त्या म्हणाल्या.

मडगावच्या कचरा समस्येवर तोडगा काढण्यासाठी मडगाव पालिकेने मडगाव व फातोडर्य़ासाठी मिश्र कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रत्येकी दोन कोटींचे दोन प्रकल्प उभारण्यासाठी सरकारकडे 30 जुलै रोजी प्रस्ताव पाठविला होता. मात्र अजुनही या प्रस्तावांना मंजुरी मिळालेली नाही याकडे लक्ष वेधताना प्रभूदेसाई म्हणाल्या, घनकचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांना मडगावची कचऱ्याची समस्या खरोखरच सोडवायची असल्यास त्यांनी हे प्रस्ताव मंजुर करावेत. 

सोनसडय़ावर नवीन कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरु करण्याचे सूतोवाच लोबो यांनी गुरुवारी केले होते त्याबद्दल प्रभूदेसाई यांना विचारले असता, अशा प्रकल्पाबद्दल सरकारने आम्हाला तरी अजुन काहीही विचारलेले नाही. याबाबती आमच्याशी कुणी पत्रव्यवहारही केला नसल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकारांशी बोलताना लोबो यांनी सोनसडय़ावर जो कचऱ्याचा डोंगर वाढला आहे तो कमी करण्यासाठी रेमेडियन पद्धतीने साफ केला जाणार असल्याचे सांगितले होते. त्यासाठी निविदा जारी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. मडगावच्या कचऱ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी लवकरच सोनसडय़ावर एक मिनी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार असे सांगून येत्या दहा बारा दिवसात त्या जागेची आपण पहाणी करणार असेही त्यांनी म्हटले होते.

Web Title: Conflict between the Municipal Corporation and Government over the Sonsodo question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.