विरोधकांचा सभात्याग
By Admin | Published: July 29, 2016 02:07 AM2016-07-29T02:07:22+5:302016-07-29T02:07:22+5:30
पणजी : कॅसिनो हटविण्याच्या प्रश्नावर कोणतेही ठोस आश्वासन मुख्यमंत्री देऊ न शकल्याने विरोधकांनी सभागृहात गदारोळ करीत सभात्याग केला.
पणजी : कॅसिनो हटविण्याच्या प्रश्नावर कोणतेही ठोस आश्वासन मुख्यमंत्री देऊ न शकल्याने विरोधकांनी सभागृहात गदारोळ करीत सभात्याग केला. गृह खात्याच्या अनुदान मागण्यांवरील चर्चेला मुख्यमंत्री रात्री नऊ-साडेनऊ वाजण्याच्या सुमारास उत्तर देत असताना
वातावरण तापले. विरोधी पक्षनेते प्रतापसिंग राणे यांच्यासह दोन काँग्रेसचे आमदार व दोन अपक्ष आमदारांनी सभात्याग केला.
रायबंदर येथे सलीम अली अभयारण्याजवळ मांडवीत ठेवलेला कॅसिनो कधी हटविणार? पंचतारांकित हॉटेलांमधील कॅसिनोंना परवाने बंद करणार की नाही? बांबोळी येथे पंचतारांकित हॉटेलात कॅसिनोसाठी दिलेला परवाना, या प्रश्नांवर आमदार रोहन खंवटे यांनी सरकावर तोफ डागली.
काही आमदार कॅसिनोच्या प्रश्नावर
दबावतंत्र वापरत आहेत. या आमदारांचे कोणाकडे व्यवहार आहेत, हे आपल्याला माहीत आहे,
असे मुख्यमंत्री म्हणाले, तेव्हा खंवटे, आमदार
नरेश सावळ, आमदार पांडुरंग मडकईकर,
आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स व राणे या पाच जणांनी सभात्याग केला.
कॅसिनोंवर कायद्याने निर्बंध घालता
येणार नाही. शुल्कवाढ करून किंवा अन्य
मार्गाने आळा घालता येईल. गावागावांत पंचतारांकित हॉटेल्स येत असल्याने तेथे
कॅसिनो येत असतील, तर कायद्यात दुरुस्तीही करता येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. (प्रतिनिधी)