मुख्यमंत्र्यांकडून कॉंग्रेसच्या योगदानाचा उल्लेख, पक्षाकडून प्रमोद सावंतांचे आभार!
By पूजा प्रभूगावकर | Published: January 29, 2024 01:16 PM2024-01-29T13:16:30+5:302024-01-29T13:17:18+5:30
प्रतापसिंह राणे हे गोव्याचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिले असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला होता.
पणजी: काँग्रेस सरकारच्या योगदानाची कबुली दिल्याबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे कॉंग्रेसने आभार मानले आहेत. प्रदेश कॉंग्रेसने सोशल मीडियावर मुख्यमंत्र्यांचे भाषण पोस्ट करुन आम्ही त्यांचे आभारी असल्याचे नमूद केले आहे.
गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्या ८५ व्या वाढदिना निमित आयोजित सोहळ्यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतकेलेल्या आपल्या भाषणात कॉंग्रेसच्या योगदानाचा उल्लेख केला असा दावा पक्षाने केला आहे.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने गोवा मुक्ती चळवळीत भाग घेतला. जनमत कौल आणि कोकणीला मान्यता हे गोव्यासाठी काँग्रेसचे दिलेले योगदान आहे. प्रतापसिंह राणे हे गोव्याचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिले असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला होता.
त्यावर कॉंग्रेसच्या योगदानाचा उल्लेख करणाऱ्या माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील काही अंशांचा व्हिडिओ मीडियावर पोस्ट करुन त्यांचे आभार मानले आहेत.