गोव्यात मुख्यमंत्री पर्रीकरांच्या राजीनाम्याची काँग्रेसची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2018 08:26 PM2018-06-22T20:26:49+5:302018-06-22T20:26:55+5:30
मनोहर पर्रीकर हे आजारी असल्याने मुख्यमंत्रीपदाला न्याय देऊ शकत नाही. ते गोव्यात परतले तरी प्रशासन अजूनही ठप्प आहे, असा दावा क रीत काँग्रेसने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
पणजी : मनोहर पर्रीकर हे आजारी असल्याने मुख्यमंत्रीपदाला न्याय देऊ शकत नाही. ते गोव्यात परतले तरी प्रशासन अजूनही ठप्प आहे, असा दावा क रीत काँग्रेसने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर पत्रकार परिषदेत म्हणाले की, आजारी असूनही काम करणे हे आत्महत्त्या करण्यासारखेच आहे. भाजप सहानुभूतीचे राजकारण करीत आहे. पर्रीकर यांना या पदावरुन मोकळीक देण्यास बहुधा भाजप तयार नाही. पर्रीकर हे आज मुख्य सचिवासारखे एखाद्या प्रशासकीय अधिकाºयाप्रमाणे काम करीत आहेत. ते केवळ कार्यालयात बसून फाइल्स हाताळतात. राजकीय नेत्याप्रमाणे त्यांना लोकांमध्ये मिसळताही येत नाही किंवा त्यांच्याशी संवादही साधता येत नाही. या स्थितीत राज्याचे भवितव्य टांगणीला लागले आहे.’
पर्रीकर यांना वैद्यकीय फिटनेस दाखला कोणी दिला, असा सवाल करुन चोडणकर म्हणाले की, साधा कर्मचारी आजारी रजेवर जातो तेव्हा त्यालादेखिल कामावर रुजू होताना फिटनेस दाखला सादर करावा लागतो. पर्रीकरांच्या बाबबीत आजार नेमका काय याबाबत सर्वांना अंधारात ठेवण्यात आले. त्यांना उपचारांसाठी अमेरिकेला नेण्यात आले याचा अर्थ त्यांना गंभीर आजार जडलेला आहे आणि त्यांनी आरोग्यावरच लक्ष देणे अधिक संयुक्तिक आहे.
पर्रीकर यांच्याबाबतीत भाजप सहानुभूतीचे राजकारण करीत असल्याचा आरोप करताना चोडणकर म्हणाले की, उपचारार्थ मुंबईतील इस्पितळात असताना पर्रीकर यांना अर्थसंकल्प मांडण्यासाठी गोव्यात आणण्यात आले. त्यानंतरच त्यांचा आजार अधिक बळावला. आजारी असूनही पर्रीकर मुख्यमंत्रीपदासारख्या जबाबदार पदावर काम करतात ही चिंतेचे बाब आहे. त्यांच्या मंत्रिमंडळातील दोन मंत्री आजारी असल्याने या मंत्र्यांच्या खात्यांचा भारही पर्रीकरांवर पडला आहे. आज ५0 पेक्षा अधिक खाती ते हाताळत आहे. ही गोष्ट ताण-तणावाचीच असून पर्रीकर हे या खात्यांना न्याय देऊ शकणार नाही. पूर्वीच्या तुलनेत ते २0 ते ३0 टक्केही काम करीत नाहीत.
चोडणकर म्हणाले की,‘गृह खाते अस्तित्त्वात आहे की नाही हा मोठा प्रश्न आहे. पिसुर्ले कॅटामाइन प्रकरणी केंद्रीय यंत्रणेच्या अधिकाºयांना येथे येऊन धाड टाकावी लागते. राज्यातील गृह यंत्रणा मात्र सुस्त आहे. पर्रीकरांच्या अनुपस्थितीत तीन महिने राज्याची पीछेहाट झाली. आता आणखी अधिक काळ सहानुभूती आणि संयम दाखवणे शक्य नाही’.
पर्रीकर सरकार कसिनोमालकांचे चोचले पुरवित असल्याचा आरोप करताना चोडणकर म्हणाले की,‘ कसिनोंकडून सरकारला पैसा मिळतो आणि त्याबदल्यात सरकार त्यांचे लाड पुरविते’.
‘कामकाजाचे दिवस वाढवा’
आगामी विधानसभा कामकाजाचे दिवस अत्यल्प असल्याचा दावा चोडणकर यांनी केला असून काँग्रेस विधिमंडळ पक्षाने कामकाजाचा कालावधी वाढविण्याची मागणी केली असल्याचे सांगितले. कामकाज सल्लागार समितीसमोर विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर या मागणीचा पाठपुरावा करतील, असे ते म्हणाले. राज्यात अनेक प्रश्न भेडसावत आहेत. विधानसभा अधिवेशनात या प्रश्नांवर चर्चा होणे आवश्यक आहे.