गोव्यात काँग्रेसच्या यात्रेने जागवली आशा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2018 01:45 PM2018-05-23T13:45:49+5:302018-05-23T13:45:49+5:30
गोव्यात मंगळवारपासून काँग्रेसची लोकसंपर्क यात्र सुरू झाली आहे.
पणजी : गोव्यात मंगळवारपासून काँग्रेसची लोकसंपर्क यात्र सुरू झाली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर, काँग्रेसचे गोवा प्रभारी डॉ. चेल्लाकुमार यांच्यासह काँग्रेसचे काही आमदार व कार्यकर्ते बसमधून व रिक्षामधून फिरून ही यात्र करू लागले आहेत. मुख्यमंत्री अडिच महिने विदेशात असल्याने गोव्यात सरकारच अस्तित्वात नाही असे चित्र उभे करण्यात विरोधी काँग्रेस पक्ष यशस्वी ठरू लागला आहे. विशेष म्हणजे विरोधी पक्षनेताही प्रथमच बसमधून फिरून आपल्यार्पयत येतो याचे कुतूहल गोमंतकीयांना वाटू लागल्याचे बाजारपेठांमध्ये फिरल्यास कळून येते.
यापूर्वी विविध पक्षांच्या यात्र ह्या वेगळ्य़ा प्रकारे पार पडल्या आहेत. बसगाडीला रथाचे रुप देऊनही यात्र काढल्या गेल्या आहेत. मात्र काँग्रेसचे नेते व कार्यकत्र्यानी प्रवासी बसगाडीमध्ये फिरत व भाडय़ाच्या रिक्षेद्वारे प्रवास करत विविध तालुक्यांमध्ये व मतदारसंघांमध्ये यात्र चालवली आहे. बुधवारी सकाळी यात्र दक्षिण गोव्यातील वास्को मतदारसंघात म्हणजे मुरगाव तालुक्यात पोहचली.
मंगळवारी यात्र उत्तर गोव्यातील पणजीसह म्हापसा, हळदोणा, मये या मतदारसंघांमध्ये फिरली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सांगितले, की राज्य प्रशासन पूर्णपणो ठप्प झाल्याने लोकांमध्ये खूप नैराश्य आहे. बाजारपेठांमध्ये व्यापारी तसेच सामान्य लोक, रिक्षा चालक व अन्य घटक आपली नाराजी व हतबलता व्यक्त करून दाखवत आहेत. लोकांचे बरेच प्रश्न प्रलंबित आहेत. नळाद्वारे पिण्याचे पाणी येत नाही, वीज पुरवठा नीट होत नाही अशा समस्या लोक सांगत आहेत. बेरोजगारीमुळे युवा वर्ग हैराण आहे.
काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी सांगितले, की लोक ठप्प झालेल्या प्रशासनाप्रती आपल्या भावना आणि संताप बोलून दाखवत आहेत. नमन तुका गोंयकारा असे नाव काँग्रेसने यात्रेला दिले आहे. लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. काँग्रेस कार्यकर्ते आणि एकूणच पक्ष संघटनेमध्ये या यात्रेने उत्साह निर्माण केला आहे. विरोधी पक्षनेते कवळेकर हे देखील बसमधून आणि रिक्षेतून प्रवास करून लोकांर्पयत पोहचत आहेत. यापूर्वी कुठल्याच विरोधी पक्ष नेत्याने अशा प्रकारे यात्र काढून लोकसंपर्क केला नाही.
काँग्रेसची ही यात्र पुढील चार-पाच दिवस फिरून सर्व मतदारसंघ कव्हर करील, असे एका नेत्याने सांगितले.