बस स्थानकावरील डबक्यात बोट चालवून काँग्रेसने केला निषेध

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2018 09:41 PM2018-07-04T21:41:18+5:302018-07-04T21:41:27+5:30

पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यात काँग्रेस पक्षाने म्हापशातील आंतरराज्य बस स्थानकाला आलेल्या तळ््याच्या स्वरुपाचा निषेध बोटी चालवून केला.

Congress protested by running a boat in a bus station | बस स्थानकावरील डबक्यात बोट चालवून काँग्रेसने केला निषेध

बस स्थानकावरील डबक्यात बोट चालवून काँग्रेसने केला निषेध

Next

म्हापसा - पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यात काँग्रेस पक्षाने म्हापशातील आंतरराज्य बस स्थानकाला आलेल्या तळ््याच्या स्वरुपाचा निषेध बोटी चालवून केला. मागील ब-याच वर्षांपासून सरकारी लालफितीत अडकलेल्या या बस स्थानकाचे रुपांतर सरकारने तळ््यात करावे व पर्यटकांसाठी विहाराची सोय करण्याची मागणी उत्तर गोवा काँग्रेसने केली. 

म्हापसा येथील प्रस्तावीक बस स्थानकाला सध्या पडत असलेल्या पावसाच्या दिवसात तळ््याचे स्वरुप प्राप्त झाले आहे. आंतरराज्य बस स्थानक असलेला हा बस स्थानकाचा परिसर तेथील मातीमुळे चिखलमय झाला आहे. या बस स्थानकावर कचरा, भंगारातील वस्तू तसेच इतर टाकावू वस्तू टाकल्याने त्याची अवस्था बकाल झाली आहे. बस स्थानकाच्या शेजारी बाजार असून बाजाराला लागून वस्ती आकार घेत असल्याने जागेचा गैरवापर होत असल्याचे उत्तर गोवा काँग्रेसचे अध्यक्ष विजय भिके यांनी निदर्शनाला आणून देत सांगितले. त्यामुळे सरकारने एक तर बस स्थानकाचा प्रस्ताव लवकरात लवकर मार्गी लावावा किंवा त्या ठिकाणी वाटर पार्क किंवा गार्डन उभारुन पर्यटकांची सोय करावी अशी निषेध व्यक्त करणारी मागणी भिके यांनी केली. 

यावेळी भिके यांनी म्हापसा मतदारसंघाचे आमदार तथा नगरविकास मंत्री अ‍ॅड. फ्रान्सिस डिसोझा यांच्यावर टिका केली. बस स्थानका संबंधी त्यांचा प्रस्ताव मार्गी लागत नसल्याने सरकार त्यांच्या मागणीवर अन्याय करीत असल्याचे स्पष्ट होत असल्याचे मत व्यक्त केले. मुख्यमंत्री स्वत: म्हापसातील रहिवाशी असल्याने त्यांच्याकडून सुद्धा सदर प्रस्तावावर दुर्लक्ष होत असल्या बद्दल आश्चर्य व्यक्त केले. 

मागील काही दिवसापासून शेतात उतरणाºया राज्यातील मंत्र्यावरही त्यांनी टिका केली. सदर प्रस्तावीक बस स्थानकासाठी सरकारकडून शेत जमिनीचा वापर करण्यात आला आहे. ज्यावेळी या भागातील शेतीचे रुपांतर केले जात होते त्यावेळी या मंत्र्यांनी होत असलेल्या रुपांतराला विरोध का केला नाही असा प्रश्न त्यांनी केला. शेती व्यवसायाबद्दल मंत्र्यांच्या मनात चांगली भावना असेल तर त्यांनी खºया अर्थाने पुढाकार घेऊन शेतीला प्रोत्साहन घ्यावे असाही सल्ला यावेळी दिला.   

काँग्रेस कार्यकारणीचे सदस्य सुदीन नाईक यांनी अ‍ॅड. फ्रान्सिस डिसोझा यांच्यावर टिका करताना मागील २२ वर्षांत मतदारसंघाचे आमदार या नात्याने त्यांना विकास करण्यास अपयश आल्याची टिका केली. राज्यात तसेच केंद्रात भाजपचे सरकार सत्तेवर असताना याच मतदारसंघावर दुर्लक्ष मुद्दामहून केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारात डिसोझा यांनी सावत्र वागणूक दिली जात असल्याचे या प्रकारातून स्पष्ट होत असल्याचे ते म्हणाले. सदर परिसरात आलेल्या वाईट अवस्थेमुळे रोगराई पसरण्याची भिती त्यांनी व्यक्त केली. 

एनएसयूआयचे हंगामी अध्यक्ष महाबळेश्वर तोरस्कर यांनी बस स्थानकाचा प्रस्ताव मार्गी न लागल्याने सरकारचे करोडो रुपयांचा महसूल पाण्याच गेल्याची टिका केली. कला भवन, बस स्थानका सारखे सरकारचे प्रस्ताव फक्त कागदावरच राहिल्याचे ते म्हणाले. लोकांच्या होत असलेल्या फसवणुकीतून लोकांनी जागे होण्याची वेळ आली असल्याचे यावेळी मत व्यक्त केले. 

Web Title: Congress protested by running a boat in a bus station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा