काँग्रेस अव्वल; तरीही सत्ता दूरच

By admin | Published: March 12, 2017 02:22 AM2017-03-12T02:22:46+5:302017-03-12T02:27:17+5:30

पणजी : विधानसभा निवडणुकीत अनपेक्षितपणे बाजी मारत काँग्रेसने सर्वाधिक १७ जागा जिंकल्या. मात्र, आकडेवारीत पहिल्या क्रमांकाचा

Congress tops; Still power away | काँग्रेस अव्वल; तरीही सत्ता दूरच

काँग्रेस अव्वल; तरीही सत्ता दूरच

Next

काँग्रेस अव्वल; तरीही सत्ता दूरच
पणजी : विधानसभा निवडणुकीत अनपेक्षितपणे बाजी मारत काँग्रेसने सर्वाधिक १७ जागा जिंकल्या. मात्र, आकडेवारीत पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनल्यानंतरही सत्तास्थापनेबाबत काँग्रेससमोर अनेक अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. तीन जागा मिळवून मुसंडी मारलेल्या गोवा फॉरवर्ड पक्षाच्या हातात सत्तेच्या चाव्या आहेत. कोणत्या पक्षाचे सरकार सत्तेवर आणायचे, हे गोवा फॉरवर्डच्या भूमिकेवर अवलंबून असल्याने काँग्रेस बचावात्मक पवित्र्यात आहे, तर १३ जागांवर पीछेहाट झालेल्या भाजपलाही सत्तास्थापनेसाठी आशेचा किरण दिसू लागला आहे. या पार्श्वभूमीवर खलबते करण्यासाठी भाजपचे नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी शनिवारी रात्री उशिरा गोव्यात दाखल झाले.

Web Title: Congress tops; Still power away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.