फुटीर आमदाराच्या नोकऱ्यांबाबत विधानावरुन गोव्यात काँग्रेसचा प्रसंगी कोर्टात जाण्याचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 08:37 PM2018-10-22T20:37:45+5:302018-10-22T20:38:01+5:30
दयानंद सोपटे यांनी नोक-यांबाबत जे विधान केले आहे, त्याची गंभीर दखल काँग्रेसने घेतली आहे. एक तर तक्रार करण्याची किंवा कोर्टात जाण्याची तयारीही पक्षाने चालवली आहे. ‘आमदार फोडण्यासाठी सरकार नोक-यांची खिरापत वाटत असेल तर ती गंभीर बाब आहे.
पणजी : दयानंद सोपटे यांनी नोक-यांबाबत जे विधान केले आहे, त्याची गंभीर दखल काँग्रेसने घेतली आहे. एक तर तक्रार करण्याची किंवा कोर्टात जाण्याची तयारीही पक्षाने चालवली आहे. ‘आमदार फोडण्यासाठी सरकार नोक-यांची खिरापत वाटत असेल तर ती गंभीर बाब आहे.
पात्रता असलेल्यांनाच नोक-या मिळायला हव्यात. भरतीची प्रक्रिया सरकार योग्यप्रकारे पार पाडत आहे का, हा देखील प्रश्न असून सोपटे यांना नोक-या देण्याचे आश्वासन सरकारने दिल्याने आता या प्रकरणाच्या मुळाशी काँग्रेस जाणार आहे.’, असे आमदार रेजिनाल्द लॉरेन्स यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, ‘विरोधी पक्षनेते असतात मनोहर पर्रीकर यांनी राष्ट्रपतींकडे तक्रारी केल्या. आता आम्हीही तक्रारींचा पर्याय खुला ठेवला असून प्रसंगी न्यायालयातही जाऊ.’ सोपटे यांनी रविवारी मांद्रे मतदारसंघातील बैठकीत सरकारने आपल्याला नोक-यांचे आश्वासन दिल्याचे जाहीर केले होते.
रेजिनाल्द पुढे म्हणाले की, ‘केंद्रात संपुआचे सरकार सत्तेवर असताना पर्रीकर भूसंपादन विधेयकाविरोधात आवाज काढत होते. परंतु मोपा विमानतळासाठी त्यांनी घाईगडबडीत जमीन संपादित केली. तेथे जमीनमालकांना पुरेशी भरपाईही दिलेली नाही. सुभाष शिरोडकर यांच्या जमिनीसाठी तब्बल ७0 कोटी रुपये दिले आणि ही जमीन खरेदी करताना ती कोणत्या कामासाठी घेतली जात आहे याची कारणही दिले नाही.’
आयपीबीच्या बैठकीचे गौडबंगाल
गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची बैठक मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून झाल्याचा जो दावा केला जात आहे त्यावर विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी संशय व्यक्त केला. ज्या पध्दतीने घिसाडघाईने प्रकल्पांना मान्यता देण्यात आली त्याबद्दलही त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. संचालकांची लपवाछपवी चालली आहे, असा आरोप कवळेकर यांनी केला.
मी काँग्रेसमध्येच : प्रतापसिंह राणे
मी काँग्रेसमध्येच आहे आणि कुठेही जाणार नाही, अशा शब्दात काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार तथा माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी
आपण कॉंग्रेसशी एकनिष्ठ असल्याचा दावा केला. पक्षामधून फुटणार असल्याच्या वृत्ताचा त्यांनी स्पष्ट शब्दात इन्कार केला. प्रसार माध्यमांनी अशी वृत्ते देण्याआधी शहानिशा करायला हवी, असे ते म्हणाले. राणे एका प्रश्नावर उत्तर देताना म्हणाले की, राज्यात सरकारच अस्तित्त्वात नाही. प्रशासन आहे कुठे? असा उलट सवाल त्यांनी केला. काँग्रेसचे आणखी तीन आमदार फुटण्याच्या मार्गावर असल्याच्या