काँग्रेसने गोव्याशी दुजाभाव केला; मुख्यमंत्र्यांची जोरदार टीका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2024 01:11 PM2024-06-16T13:11:04+5:302024-06-16T13:12:09+5:30

केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचा सत्कार

congress was enmity with goa criticism cm pramod sawant | काँग्रेसने गोव्याशी दुजाभाव केला; मुख्यमंत्र्यांची जोरदार टीका 

काँग्रेसने गोव्याशी दुजाभाव केला; मुख्यमंत्र्यांची जोरदार टीका 

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: काँग्रेस सरकारने गोव्याचा काहीच विकास केला नाहीं. केंद्रात, राज्यात सत्ता असतानाही गोव्याला सावत्रपणाची वागणूक दिली. विकासासाठी निधी असो की गोव्याला केंद्रीय मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व देण्याबाबत विषय काँग्रेसने नेहमीच दुजाभाव केला, अशी टीका मुख्यमंत्री डी. प्रमोद सावंत यांनी काल केली. खासदार श्रीपाद नाईक यांची केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपदी नियुक्ती केल्याबद्दल काल प्रदेश भाजपकडून पणजीत सत्कार केल्ला. मिनेझिस ब्रोगाझा सभागृहात त्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

कार्यक्रमास राज्यसभा खासदार तथा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, मंत्री माचिन गुदिन्हो, मंत्री सुभाष फळदेसाई, आमदार डिलायला लोबो, आमदार डॉ. दिव्या राणे, उल्हास नाईक तुवेकर, संकल्प आमोणकर, प्रेमेंद्र शेट, रुदोल्फ फर्नाडिस, माजी खासदार अॅड, नरेंद्र सावईकर व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

श्रीपाद नाईक हे सलग सहाव्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. या निवडणुकीत ते १ लाख २७ हजार मताधिक्याने निवडून आले असून एवडे मताधिक्य पहिल्यांदाच मिळाले. गोया है लहान राज्य असून केवळ दोनच खासदार आहेत. मात्र असे असूनही भाजप सरकारने गोव्याला नेहमीच गांभीर्याने घेतले.

भाजपचा गोव्यातून एक खासदार निवडून आला तरी भाजप सरकार त्यांना मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व दिले. श्रीपादभाऊ है केंद्रात १५ वर्ष मंत्री म्हणून गोव्याचे प्रतिनिधित्व करीत आहेत. यावरूनच भाजपचे गोव्यावर असलेले प्रेम दिसून येते, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

निधी देण्यात आखडता हात 

काँग्रेसने गोव्याला कधीच गांभीर्याने घेतले नाही, मग ते विकासाच्याबाबतीत असो की निधीच्याबाबतीत, त्याचबरोबर गोव्याला केंद्रीय मंत्रिमंडळातही प्रतिनिधित्व देण्याविषयी काँग्रेसमध्ये उदासीनता होती. गोष्यातून काँग्रेसचे खासदार निवडून आले तरी काँग्रेस सरकारने त्यांना दुर्लक्षित केले. काँग्रेसने विकास कामांसाठी हवा तितका निधीं कधीच दिला नाही, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.

विरोधकांना सत्य दिसेना 

राज्यमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले, आपला आजचा सत्कार हा भाजप पक्षाच्या सामान्य कार्यकत्यांचा सत्कार आहे. निवडणुकीत विरोधकांकडे आपल्याला विरोधात कुठलेही मुद्दे नव्हते. त्यामुळे उत्तर गोव्यातील विकासाचा मुद्दा त्यांनी काडला. खरे तर देशात विकासाबाबत उत्तर गीचा हा दहाव्या स्थानी आहे है विरोधक विसरले आहेत, असा टोलाही लगावला.

 

Web Title: congress was enmity with goa criticism cm pramod sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.