ट्रकचालकांच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष : राणे
By admin | Published: September 21, 2015 01:54 AM2015-09-21T01:54:55+5:302015-09-21T01:55:09+5:30
पणजी : खाण व्यवसायात अतिमहत्त्वाची बाजू उचलून धरणाऱ्या ट्रकचालकांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी गेले कित्येक दिवस गोवा ट्रकचालक संघटनेकडून करण्यात येत आहे;
पणजी : खाण व्यवसायात अतिमहत्त्वाची बाजू उचलून धरणाऱ्या ट्रकचालकांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी गेले कित्येक दिवस गोवा ट्रकचालक संघटनेकडून करण्यात येत आहे; पण राज्याचे मुख्यमंत्री आमच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत, असा आरोप शिवसेनेचे राज्यप्रमुख अजितसिंग राणे यांनी केला.
पणजी येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी गोवा ट्रकचालक संघटनेचे अध्यक्ष विष्णू सावळ, शिवसेना तिसवाडी तालुकाध्यक्ष धनंजय पाटील, समीर च्यारी, कायदा सल्लागार कृष्णा नाईक आणि इतर सदस्य उपस्थित होते. गेले अनेक दिवस ट्रकचालकांना आर्थिक मदतीचे पॅकेज देण्याची मागणी सरकारकडे करण्यात येत आहे; पण ही मागणी जास्त होते आणि इतके पैसे सरकारकडे नाहीत, असे सांगून ट्रकचालकांची दिशाभूल करण्याचे काम सरकार करत आहे. आम्ही सरकारकडे आमच्या हक्काचे पैसे मागत आहोत, भीक मागत नाही, असे उद्गार त्यांनी या वेळी काढले. आॅक्टोबर महिन्यात खाणी सुरू करण्यात येतील, असे सांगितले जात आहे; पण त्याबाबत कोणतीही ठोस भूमिका किंवा पाऊल सरकार उचलत नाही, असा आरोपही या वेळी राणे यांनी केला. (प्रतिनिधी)