मुसळधार कायम! जुलैच्या पहिल्या आठवड्यात कोसळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2023 10:32 AM2023-07-02T10:32:29+5:302023-07-02T10:34:19+5:30

त्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून पिवळा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

constant torrent It will collapse in the first week of july | मुसळधार कायम! जुलैच्या पहिल्या आठवड्यात कोसळणार

मुसळधार कायम! जुलैच्या पहिल्या आठवड्यात कोसळणार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : गेल्या आठवडाभरात राज्याला पावसाने चांगलेच झोडपले असताना आता जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही मुसळधार पाऊस पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून पिवळा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

२८ टक्के राहिलेली मान्सूनची तूट भरून काढण्याच्या दिशेने मान्सूनची वाटचाल आहे. यंदा मान्सून उशिरा दाखल झाला आणि गोव्यात दाखल झाल्यावर मान्सून मंदावलाही, परंतु जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावली. आता जुलैचा पहिला आठवडा तो बरसणार असल्याचे संकेत हवामान खात्याच्या अंदाजांवरून मिळत आहेत.

तूर्त हवामान खात्याकडून ५ जुलैपर्यंत केसरी अलर्ट जारी केला आहे, परंतु मान्सून अत्यंत सक्रिय झालेला असून अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरातही मान्सूनला अत्यंत पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यानंतरही जोरदार वृष्टी चालूच राहणार असा अंदाज हवामान शास्त्रज्ञ करीत आहेत.

देशाच्या ९६ टक्के भागात पोहोचला पाऊस

देशातील ९६ टक्के भागात मान्सून पोहोचला आहे. ४०० जिल्ह्यांत तुटीचा मान्सून दर्शवित आहे. देशात सरासरी १० टक्के तुटीच्या मान्सूनच्या तुलनेत गोव्यातील मान्सूनची २८ टक्के तूट ही अधिक वाटत असली तरी जुलैच्या सुरुवातीलाच सक्रिय झालेला मान्सून ही तूट मोठ्या प्रमाणात भरून टाकण्याची पूर्ण शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात येत आहे.

गोव्यात दरदिवशी १.२३ इंचांची नोंद

आतापर्यंत २५ टक्के सरासरी हंगामी पावसाची नोंद झाली आहे. गोव्यात ८ जून रोजी मान्सून दाखल झाला. ८ ते ३० जूनपर्यंतच्या २२ दिवसांच्या पावसाचा हिशेब केल्यास दर दिवशी सरासरी १.२३ इंच पाऊस पडला.

दरड कोसळली

म्हापसा येथील मिलाग्रीस चर्चच्या वरच्या बाजूला राजवाडो परिसरात दरड कोसळण्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे काही घरांना धोका निर्माण झाला आहे. शुक्रवारी रात्री ही घटना घडल्याची माहिती नगरसेवक प्रकाश भिवशेट यांनी दिली. दरड कोसळून डोंगरावरील माती, दगड रस्त्यावर आल्याने रस्ता बंद झाला आहे. डोंगराच्या वरच्या बाजूला असलेल्या घरांनाही यातून धोका निर्माण झाला आहे. शनिवारी सकाळी भिवशेट यांनी दरड कोसळलेल्या ठिकाणी जाऊन तेथील पाहणी केली.

झाड पडून एकजण जखमी

खापरभाट - नासनोडा येथे शनिवारी धावत्या दुचाकीवर झाड पडून रामनाथ वायंगणकर (७२) हे जखमी झाले. अग्निशमनच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होऊन पडलेले झाड बाजूला केले. वायंगणकरांची तब्येत चिंताजनक नसल्याचे सांगण्यात आले आहे.

स्त्यावर झाड पडले

मडगाव : बोलशे सर्कल येथील क्लॅरिना पेट्रॉल पंपजवळ एक झाड उन्मळून रस्त्यावर पडले. शनिवारी ही घटना घडली. मडगाव अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन झाडाच्या फांद्या कापून काढल्या.दरम्यान, शनिवारीही पावसाने मडगाव व अन्य जवळच्या भागाला झोडपून काढले.

Web Title: constant torrent It will collapse in the first week of july

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.