अटक केल्यानंतर संशयितांबरोबर फोटो घेणे पोलिसांना अंगलट, हायकोर्टकडून अवमान नोटीसा
By वासुदेव.पागी | Published: April 1, 2024 05:36 PM2024-04-01T17:36:15+5:302024-04-01T17:36:30+5:30
गुन्हेगारी प्रकरणात एखाद्या संशयिला पकडल्यानंतर पोलीस त्या संशयितांबरोबर स्वत:चे फोटो घेऊन प्रसिद्धी माद्यमांना देण्याची जुनी पद्धत होती, ही पद्धत बंद करणारा आदेश ३ वर्षांपूर्वी न्यायालयाने दिला होता.
पणजी : गुन्हेगारी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या संशयितांबरोबर आपला फोटो प्रसिद्ध करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने नोटीसा बजावल्या आहेत. असे करण्यास न्यायालयाची बंदी असतानाही त्याचे ७० उल्लंघन झाल्याचे आढळून आले आहे.
गुन्हेगारी प्रकरणात एखाद्या संशयिला पकडल्यानंतर पोलीस त्या संशयितांबरोबर स्वत:चे फोटो घेऊन प्रसिद्धी माद्यमांना देण्याची जुनी पद्धत होती, ही पद्धत बंद करणारा आदेश ३ वर्षांपूर्वी न्यायालयाने दिला होता. संशयितांबरोबर फोटो न घेण्याचा आदेश देण्यातआला होता. परंतु त्या घटनेनंतरही अजून पोलिसांचे संशयितांबरोबर फोटो घेऊन ते प्रसिद्ध करण्याचे प्रकार चालूच असल्याचे आढळून आले आहे. यामुळे न्यायालयाचा अवमान झाल्याचा दावा करून न्यायालयाकडून या प्रकरणात स्वेच्छा दखल घेण्यात आली आहे.
एकदा वृत्तपत्रात किंवा न्युज एजन्सीत प्रसिद्ध झालेले फोटो पुन्हा सोशल मिडियावर टाकले जातात आणि त्यामुळे ते व्हायरल होतात. अशाच व्हायरल फोटोंची दखल न्यायालयाकडून घेण्यात आली आहे. संशयितांबरोबर फोटोत जे पोलीस दिसत आहेत त्या सर्वांना नोटीसा बजावण्यात आली आहे. या प्रकरणात १५ एप्रील रोजी पुढील सुनावणी होणार आहे.