रात्रीच्या पार्ट्या करताना आवाजावर नियंत्रण ठेवा : शिवाेलीच्या आमदार डिलायला लोबो यांचं आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2023 03:10 PM2023-10-27T15:10:15+5:302023-10-27T15:10:25+5:30

शिवाेली कुळंगुट या मतदारसंघात माेठ्या प्रमाणात पर्यटक येत असून अनेक पर्यटक हे रात्री खास मनोरंजसाठी पाट्या करतात.

Control noise during night parties: Shivelli MLA Dilayla Lobo's appeal | रात्रीच्या पार्ट्या करताना आवाजावर नियंत्रण ठेवा : शिवाेलीच्या आमदार डिलायला लोबो यांचं आवाहन

रात्रीच्या पार्ट्या करताना आवाजावर नियंत्रण ठेवा : शिवाेलीच्या आमदार डिलायला लोबो यांचं आवाहन

नारायण गावस

पणजी: गोवा हे पर्यटन राज्य असल्याने गाेव्यात पर्यटक माेठ्या प्रमाणात येत आहे. बहुतांश पर्यटक हे रात्री पार्ट्यांचा आनंद लुटतात पण अशा वेळी आयोजकांनी याची दखल घेणे गरजेचे आहे. पाट्यार्च्या आयोजन करताना इतरांना त्या आवाजाचा त्राज्ञ होऊ नये याची दखल घ्यावी. आपल्या हाॅटेलभोवती याेग्य ती काळजी घ्यवी, असे शिवाेलीच्या आमदार डिलायला लोबो यांनी सांगितले.

शिवाेली कुळंगुट या मतदारसंघात माेठ्या प्रमाणात पर्यटक येत असून अनेक पर्यटक हे रात्री खास मनोरंजसाठी पाट्या करतात. याचे खास हाॅटेलमध्ये पार्ट्यांचे आयोजन केले जाते. पण रात्री उशीरा पर्यंत मोठ्या आवाजाने पार्ट्या करुन कायद्याचे उल्लंघन करतात. त्यांच्यावर गोवा प्रदुषण मंडळ तसेच स्थानिक पंचायतीकडून कारवाई केली जात आहे. सर्व पंचायती तसेच प्रदुषण मंडळाला तसेच आदेश सरकारने दिले आहे. त्यामुळे पार्ट्याच्या आयोजकांनी याेग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे, असे आमदार लोबो म्हणाल्या.

भुमिगत वीजवाहीन्यांचे काम सुरु असल्याने रस्ते खोदले होते. आता त्याच काम पूर्ण झाले असून लवकर सर्व रस्ऱ्यावर हॉटमिक्सीगचे काम केेले जाणार आहे. पुढच्या १० नोव्हेबर रोजी हॉटमिक्सचे काम हाती घेतले जाणार आहे. पावसाळा असल्याने हे हॉटमिक्स काम हाती घेतले नव्हते. आता पावसाळा गेल्याने सर्व शिवाेलीतील रस्ते हॉटमिक्स केले जाणार आहे, असेही डिलायला लोबो म्हणाल्या.

Web Title: Control noise during night parties: Shivelli MLA Dilayla Lobo's appeal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.