नगरनियोजन कायदा कलम ३९ अ वरुन सभागृहात गदरोळ
By पूजा प्रभूगावकर | Published: February 7, 2024 05:27 PM2024-02-07T17:27:40+5:302024-02-07T17:28:35+5:30
आमदार वेन्झी यांना मार्शलकरवी काढले सभागृहाबाहेर.
पूजा नाईक (प्रभूगावकर), पणजी: नगरनियोजन कायदा दुरुस्ती विधेयक २०२४ अंतर्गत कलम ३९ अ ला विरोधी आमदारांनी जाेरदार विरोध केला. त्यामुळे सभागृहात बराच गदारोळ झाला.
विरोधी आमदारांनी यावेळी या दुरुस्ती विधेयकावर मतदानाची मागणी करुन सभापतींच्या हौदात धाव घेतल्याने त्यांना मार्शलकरवी बाहेर काढले. यावेळी गोंधळातच सदर दुरुस्ती विधेयक संमत करण्यात आले.
नगरनियोजन कायदा अंतर्गत असलेले कलम १६ ब च्या जागी सरकारने कलम ३९ अ अस्तित्वात आणले आहे. मात्र कलम १६ ब व कलम ३९ अ मध्ये फरक काय ? गोव्यातील जमिनी एक प्रकारे नष्ट करण्याचा हा डाव असल्याचा आरोप करुन त्याला विरोधी आमदारांनी तीव्र विरोध केला. या विधेयकावर मतदान घ्यावे अशी मागणी त्यांनी केली. मात्र सभापतींनी त्यांची ही मागणी मान्य न करता विधेयक संमत केल्याने एकच गदारोळ झाला.