पुतळ्यावरून वाद, मंत्र्यांवर दगडफेक; सुभाष फळदेसाईंनी समंजसपणा दाखविल्याने तणाव निवळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2024 02:11 PM2024-02-20T14:11:59+5:302024-02-20T14:12:27+5:30

सां जुझे दि अरियाल येथील घटना 

controversy over statue stone pelting on ministers but subhash phal desai showed reasonableness and the tension subsided | पुतळ्यावरून वाद, मंत्र्यांवर दगडफेक; सुभाष फळदेसाईंनी समंजसपणा दाखविल्याने तणाव निवळला

पुतळ्यावरून वाद, मंत्र्यांवर दगडफेक; सुभाष फळदेसाईंनी समंजसपणा दाखविल्याने तणाव निवळला

लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव: छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावरून काल, सोमवारी सां जुझे दि अरियाल येथील पाद्रीभाटमधील वातावरण चिघळले. संतप्त जमावाने समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांना लक्ष्य बनवत त्यांच्यावर दगडफेक केली. यात ते किरकोळ जखमीही झाले. फळदेसाई हे या पुतळ्याचे अनावरण करून माघारी जात असताना हा प्रसंग घडला.

यावेळी घटनास्थळी उपस्थित शिवप्रेमी आक्रमक झाल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्जही करावा लागला. दरम्यान, मंत्री फळदेसाई यांच्याशी संपर्क साधला असता, सर्वांनी धार्मिक सलोखा सांभाळावा, कुणीही कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन केले.

रविवारपासून या भागात तणावाचे वातावरण होते. त्यामुळे पोलिसांनी ज्यादा कुमकही बोलावून घेतली होती. पाद्रीभाट येथील एका खासगी जागेत हा पुतळा बसविण्यात आला आहे. ही जागा मकानदर यांची आहे. ते स्वतः मुस्लीम आहेत. त्यांनी ही जागा अनंत तांडेल यांना दिली आहे. मुख्य रस्त्यापासून ही आगा दूर आहे, टेकडीवजा अशी ही जागा आहे. रविवारी या पुतळ्याच्या ठिकाणी जाण्यासाठी त्या खासगी जमिनीतून रस्ता तयार करण्याचे काम केले जात असताना, स्थानिकांनी त्याला हरकत घेतली होती. त्यावेळी वेळ्ळीचे आमदार कुझ सिल्वा हेही नंतर घटनास्थळी आले होते. पुतळा बसविण्यास आक्षेप नाही. मात्र, डोंगर कापणी व बेकायदा मातीचा भराव टाकण्याला आपला आक्षेप असल्याचे त्यांनी सांगितले होते.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर मडगावचे पोलिस उपाधीक्षक संतोष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली मायणा-कुडतरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण गावस देसाई व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती, नंतर जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली होती. ती जमीन खासगी असल्याचे सिद्ध झाले होते, शिवप्रेमीनी नंतर त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा विराजमान केला होता. सोमवारी सकाळी पुन्हा या ठिकाणी दोनशे लोक जमले होते. 

फळदेसाई यांनी आपण याप्रकरणी पोलिसांत तकार दिलेली नाही. आपल्याला हे प्रकरण वाढवायचे नाही. सर्वांनी शांतता राखावी, असे आवाहन केले. दगडफेकीनंतर त्यांनी आपल्या घरी जाऊन डॉक्टरकडून उपचार करून घेतले. घटनास्थळी रेटारेटीत आठ पोलिसांनाही अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात वैद्यकीय तपासणीसाठी पाठवून देण्यात आले. यात सामाजिक कार्यकर्ते फ्रेडी ग्रावासो हेही जखमी झाले. त्यांना दक्षिण गोया जिल्हा इस्पितळात दाखल केले. घटनास्थळी दिवसभर पोलिस चंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिस उपअधीक्षक संतोष देसाई, मायणा-कुडतरीचे पोलीस निरीक्षक अरुण देसाई, फातोडचि पोलिस निरीक्षक दितेंद नाईक य कुंकळ्ळीचे पोलिस निरीक्षक डायगो ग्रासीयस उपस्थित होते.

जमावासोबत बोलत असतानाच पाठीमागून दगडफेक सुरू झाली. उपदंडाधिकारी सुयश खांडेपारकर हेही घटनास्थळी होते. त्यांनी जमावाला शांतता राखण्याचेही आवाहन केले. नंतर मंत्री सुभाष फळदेसाई हे पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी आले. अनावरण करून परत जात असताना जमावाने त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत दगडपक केली.

फळदेसाई पुतळ्याचे अनावरण करून जात असताना जमावाने त्यांना घेरले व आमच्या गावात हा पुतळा नको, असे सांगत मिरवणूक काढू देणार नसल्याचा इशारा दिला. यावेळी फळदेसाई यांनी जमावाला समजावून सांगताना ही जागा खासगी असून, काही हरकत असल्यास उपजिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊ, असेही सांगितले, मात्र, जमाव काहीच ऐकायला तयार नव्हता. त्याचवेळी पाठीमागून त्याच्यावर दगडफेकले गेले, नंतर पोलिसांनी कडे करून त्यांना सुखरूप बाहेर काढले.

पूर्वनियोजित हल्ला....

आपल्यावरील हल्ला हा पूर्वनियोजित असावा, असा संशय मंत्री फळदेसाई यांनी व्यक्त केला आहे. सर्वांनी शांतता बाळगावी, असेही ते म्हणाले. जाताना आम्हाला कुणी अटकाव केली नाही. मात्र, पुतळ्याचे अनावरण करून येताना काही महिला पुढे आल्या होत्या. त्या लोटांगण घालीत होत्या. त्यांचा हेतू कळत नव्हता, असेही ते म्हणाले.

पंचायतीकडून 'स्टॉप वर्क' नोटीस

सां जुझे आरियल पंचायतीने पादीभाट परिसरात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासंदर्भात जमीन मालक सरताज मकानदार यांना नोटीस पाठविण्यात आली आहे. पुतळा उभारण्यासाठी पंचायतीकडून परवाना न घेतल्याने ही स्टॉप वर्क नोटीस पाठविल्याची माहिती उपसरपंच वालेंत फर्नाडिस यांनी दिली. यासंदर्भात कार्मिला फर्नाडिस यांनी तक्रार केली होती. सव्हें कमांक २२१/२ मध्ये पंचायत राज कायदा १९९४ अंर्तगत बेकायदेशीर काम सुरु असल्याचे तसेच पंचायत तसेच इतर सरकारी आस्थापनाकडून परवाने न घेता काम केल्याचे पंचायतीचे सरपंच लिडा फर्नाडिस यांनी जारी केलेल्या नोटीसीत म्हटले आहे.

मी लाथाडत असल्याचे चित्र 'ते' निर्माण करत होते

पुतळ्याचे उद्‌घाटन केल्यानंतर परत जात असताना काहीजण आले व थेट पायाखाली पडू लागले. त्याचवेळी तीन-चारजण कॅमेरे घेऊन पुढे येत होते. जणू काही आम्ही त्यांना लाथाडत असल्याचे चित्र निर्माण करायचे होते. आम्ही मारहाण केली, असेही दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला असता, परंतु आम्ही मोजकेच तिथे होते आणि ते दोनशेच्यावर होते, ज्या जागेवर हा पुतळा उभारला गेला आहे ती जागा खासगी असून तिथे कुणी रहिवाशीही नाही. त्या जमिनीचा झोनहीं बदलेला नाही तसेच तिथे सिमेंटचे कुठलेही कामही केलेले नाही. 

एका मुस्लिम बांधवाने आम्हाला या जागेवर पुतळा उभारला जाणार असून, त्याचे अनावरण करण्याचे आमंत्रण दिले होते. छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. सर्व धर्माना जोडून त्यांनी स्वराज स्थापन केले होते, असे फळदेसाई म्हणाले. दोन महिन्यांपूर्वी आपल्याला या जागेचे मालक व शिवप्रेमी भेटले होते. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बांधण्याचा विचार बोलून दाखविला होता. आपण त्यांना सर्व कायदेशीर सोपास्कार करण्यास सांगितले होते. त्यांनी ते केलेही होते, असेही फळदेसाई यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज हे दडपशाहीविरुद्ध लढणारे आणि जनतेच्या हक्कांसाठी उभे राहिलेले राजे होते. त्यांचा समतेवर विश्वास होता. महाराजांनी सर्व जाती-धर्मातील लोकांना आदराने वागवले. सां जुझे दे आरियाल येथील स्थानिक लोकांना विश्वासात घेऊनच उपक्रम हाती घेणे गरजेचे होते. लोकसभा जवळ आल्याने भाजपने पुन्हा एकदा 'ध्रुवीकरण' सुरू केल्याचे दिसते. - अमित पाटकर, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

 

Web Title: controversy over statue stone pelting on ministers but subhash phal desai showed reasonableness and the tension subsided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.