रेबिज मुक्त देश, रेबीज मुक्त गोवा हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सहकार्य करा: सुदिन ढवळीकर
By आप्पा बुवा | Published: October 6, 2023 07:08 PM2023-10-06T19:08:18+5:302023-10-06T19:08:33+5:30
बांदोडा ग्रामपंचायतच्या वतीने रॅबिसमुक्त गोवा ह्या जनजागृती कार्यक्रमा प्रसंगी ते बोलत होते.
फोंडा- आरोग्याच्या बाबतीत गोव्यातील नागरिक सजग असून, आरोग्य विषयक नियमांचे ते काटेकोरपणे पालन करतात. काही वर्षांपूर्वी ज्यावेळी कुष्ठरोगाची साथ होती त्यावेळी कुष्ठरोग निर्मूलनासाठी नागरिकांनीच पुढाकार घेतला होता. तोच कित्ता गिरवताना आज सरकारने रेबीजमुक्त गोवा हे स्वप्न पाहिले आहे. त्यासाठी सुद्धा गोमंतकीय जनतेने सरकारला सहकार्य करावे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सुद्धा हे स्वप्न असून गोव्यातील प्रत्येक पंचायतीने हा उपक्रम गांभीर्याने राबवावा व आपला परिसर रेबीज मुक्त करावा. असे आवाहन वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केले.
बांदोडा ग्रामपंचायतच्या वतीने रॅबिसमुक्त गोवा ह्या जनजागृती कार्यक्रमा प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सरपंच सुखानंद कुर्पासकर, उपसरपंच चित्रा फडते, पंच सदस्य मुक्ता नाईक, रामचंद्र नाईक, वामन नाईक आदी व्यासपीठावर उपस्थित होते. रेबीज मुक्त गोवा करायचा असल्यास प्रत्येकाने आपल्या घरातील श्वानांचे लसीकरण करून घ्यावें .त्याचबरोबर परिसरातील भटक्या श्वानांना सुद्धा लसीकरण कसे करता येईल ते पहावे. यासाठी जो काही खर्च येईल तो द्यायला सुद्धा आम्ही तयार आहोत.