Coronavirus : सुरक्षा किटच्या अभावी 108 कर्मचारी असुरक्षेच्या घेऱ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 04:09 PM2020-03-29T16:09:45+5:302020-03-29T16:14:54+5:30
Coronavirus : कोरोना फैलावण्याचा धोका व्यक्त केला जात असताना वेगवेगळ्या प्रकारच्या रुग्णांना हाताळणारे हे कर्मचारी केवळ तोंडाला मास्क बांधून आपली सेवा देत आहेत.
सुशांत कुंकळयेकर
मडगाव - सगळे जग कोरोनाच्या भीतीखाली वावरत असताना गोव्यात अत्यावश्यक रुग्ण सेवा देणारे 108 रुग्णवाहिकांचे कर्मचारीही असुरक्षितपणे काम करत आहेत. एकाबाजूला कोरोना फैलावण्याचा धोका व्यक्त केला जात असताना वेगवेगळ्या प्रकारच्या रुग्णांना हाताळणारे हे कर्मचारी केवळ तोंडाला मास्क बांधून आपली सेवा देत आहेत.
गोव्यात रुग्णांना त्वरित रुग्णवाहिका प्राप्त व्हावी यासाठी 108 सेवा उपलब्ध आहे. कुणालाही 108 क्रमांक डायल केल्यास ही सेवा उपलब्ध होते. दिवसाचे 24 तास ही सेवा देण्यात येत असते. गोव्यात सुमारे 200 कर्मचारी या सेवेत आहेत.वास्तविक महामारी सारखी साथ पसरली तर अशा रुग्णांना हाताळण्यासाठी अशा सेवेतील कर्मचाऱ्यांना खास सुरक्षा किट दिले जाते. त्यात कर्मचाऱ्यांचे पूर्ण अंग अशा प्रकारचे कपडे असतात. गोव्यातील कर्मचाऱ्यांना नेमकी हीच किट उपलब्ध झालेली नाही. अशा प्रकारची किट 108 च्या कर्नाटकातील कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून दिली आहे मात्र अजून आम्हाला मिळालेली नाही असे काही कर्मचाऱ्यांनी लोकमतला सांगितले.
वास्तविक कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना हाताळण्यासाठी ही खबरदारी घेणे अत्यावश्यक असते. कोरोना रुग्ण हाताळण्यासाठी 108 ने दोन रुग्णवाहिका तयार ठेवल्या आहेत. त्या रुग्णवाहिकावरील कर्मचाऱ्यांना ही सुरक्षा किट देण्यात आली आहे. मात्र इतरांना ती अजून मिळालेली नाही. एका कर्मचाऱ्याने लोकमतशी बोलताना सांगितले की आम्हाला कुठलेही रुग्ण हाताळावे लागतात तो कोरोना बाधित की नाही हे आम्हाला कसे कळणार. हे किट नसताना आमचा जीव धोक्यात घालण्याचा हा प्रकार नव्हे का?
काही कर्मचाऱ्यांनी असे किट नसताना काम करण्यास विरोध केला असता त्यांना एक तर अशा अवस्थेत काम करा किंव्हा काम सोडून जा असे सांगण्यात आले. या संदर्भात 108 चे गोवा कार्य प्रमुख गुरू प्रधान शेट्टी यांच्याशी संपर्क साधला असता ज्या रुग्णवाहिका कोरोना केसेस हाताळतात त्यांना आम्ही हे किट पुरविले आहेत. आम्ही या किट्सची मागणी नोंदवली आहे पण ही किट्स घेऊन येणारी वाहने कर्नाटकात अडल्याने ती गोव्यात पोहोचू शकलेली नाहीत. सोमवारी ती पोहोचतील. त्यानंतर आम्ही ती सर्वाना देऊ असे त्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : इटलीत परिस्थिती गंभीर! कोरोनाशी लढणाऱ्या 51 डॉक्टरांना गमवावा लागला जीव
Coronavirus : कंपनी असावी तर अशी! एप्रिलमध्ये 'या' कर्मचाऱ्यांना मिळणार 25 टक्के जास्त पगार
Coronavirus : त्यांचा तो प्रवास ठरला अखेरचा, गावाकडे निघालेल्या 13 जणांचा मृत्यू
Coronavirus : धक्कादायक! दारुची दुकानं बंद असल्याने 5 जणांची आत्महत्या
Coronavirus : लॉकडाऊनचे तीन तेरा! खरेदीसाठी नागरिकांची झुंबड