CoronaVirus News: गोव्यात दहा दिवसांत १९९७ रुग्णांना डिस्चार्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 02:02 AM2020-08-12T02:02:25+5:302020-08-12T02:02:53+5:30
राज्यात एका बाजूने कोविडग्रस्तांची संख्या खूप वाढत आहे व दुसऱ्या बाजूने अनेक जण कोविडच्या आजारातून बरेही होत आहेत.
पणजी : गोव्यात रोज दीडशे ते दोनशे कोविडग्रस्तांना कोविड निगा केंद्रातून किंवा इस्पितळातून डिस्चार्ज दिला जात आहे. गेल्या दहा दिवसांत एकूण १ हजार ९९७ कोविडग्रस्तांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात एका बाजूने कोविडग्रस्तांची संख्या खूप वाढत आहे व दुसऱ्या बाजूने अनेक जण कोविडच्या आजारातून बरेही होत आहेत.
कोविडग्रस्तांची जास्त संख्या ही चार तालुक्यांतच आहे. मुरगाव, सासष्टी (दक्षिण गोवा) बार्देश व तिसवाडी (उत्तर गोवा) या चार तालुक्यांमध्ये जास्त कोविडग्रस्त आढळतात. पणजी रुग्णालयाच्या क्षेत्रात कोविडग्रस्तांची संख्या वाढत आहे. आल्तिनोला कोविडग्रस्तांची संख्या गेल्या पंधरा दिवसांत वाढली. मंगळवारी तिथे आणखी सात नवे कोविडग्रस्त आढळले.
कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या दक्षिण गोव्यातील सर्वात मोठ्या वेर्णा औद्योगिक वसाहतीत स्थिती अजूनही नियंत्रणात आलेली नाही. खबरदारीचा उपाय म्हणून काही उद्योगांनी स्वत:हून आपले कारखाने बंद ठेवण्यास सुरुवात केली आहे.