२२ दिवसात गोव्यातून ४ हजार २३९ विदेशी पर्यटकांना मायदेशी पाठवलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 10:16 PM2020-04-15T22:16:01+5:302020-04-15T22:16:37+5:30

दाबोळी विमानतळावर २३ खास विमाने येऊन गोव्यात लॉकडाऊन मुळे अडकलेल्या विदेशी पर्यटकांना घेऊन मायदेशी परतली

Coronavirus: In 22 days, 4 thousand 239 foreign tourists were sent from Goa to their homeland | २२ दिवसात गोव्यातून ४ हजार २३९ विदेशी पर्यटकांना मायदेशी पाठवलं

२२ दिवसात गोव्यातून ४ हजार २३९ विदेशी पर्यटकांना मायदेशी पाठवलं

Next

पंकज शेट्ये
 

वास्को: कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी देश भरात लागू केलेल्या लॉकडाऊन मुळे गोव्यात अडकलेल्या विविध राष्ट्रातील पर्यटकांना मायदेशी पाठवण्यासाठी मागच्या २२ दिवसात उत्तम पावले उचलण्यात आलेली आहेत. बुधवारी (दि. १५) भारतात लॉकडाऊन लागू करून २२ दिवस पूर्ण झाले असून याकाळात दाबोळी विमानतळावर दाखल झालेल्या २३ खास विमानातून ४२३९ विविध राष्ट्रातील नागरिकांना त्यांच्या मायदेशी पाठवण्यात आले आहे. गोव्यात अजूनही काही विदेशी पर्यटक अडकून राहीलेले असून त्यांना त्यांच्या मायदेशी पाठवण्यासाठी येणाऱ्या दिवसात उचित पावले उचलण्यात येणार असल्याची माहीती दाबोळी विमानतळाचे संचालक गगन मलिक यांनी त्यांच्याशी संपर्क केला असता दिली.

कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी भारतात २५ मार्च पासून लॉकडाऊन लागू करण्यात आलेला आहे. लॉकडाऊन लागू केल्यानंतर इतर ठिकाण्याबरोबरच गोव्यातील विमानसेवा सुद्धा सद्या रद्द करण्यात आलेली आहे. लॉकडाऊन लागू केल्याने गोव्यात विविध राष्ट्रातील शेकडो विदेशी पर्यटक अडकून राहीले होते. या विदेशी पर्यटकांना त्यांच्या मायदेशी पाठवण्यासाठी उचित पावले उचलल्यानंतर २५ मार्च ते १५ एप्रिल (आज पर्यंतचा आकडा) अशा काळात ४२३९ विदेशी नागरिकांना अजून पर्यंत त्यांच्या राष्ट्रात सुखरूप रित्या पाठवण्यात आलेले असल्याची माहीती दाबोळी विमानतळ संचालक गगन मलिक यांनी दिली. या विदेशी नागरिकांना त्यांच्या राष्ट्रात नेण्यासाठी दाबोळी विमानतळावर अजून पर्यंत २३ खास विमाने दाखल झाल्यानंतर यातून सदर पर्यटक त्यांच्या मायदेशी परतले आहेत. मागच्या २२ दिवसात दाबोळी विमानतळावरून मायदेशी परतलेल्या या विदेशी पर्यटकात रशिया, स्पेन, जर्मनी, युनायटेड किंगडम, इस्त्राईल, अमेरिका, पोलंड, कजाकीस्तान इत्यादी विविध राष्ट्रातील नागरिकांचा समावेश असल्याची माहीती दाबोळी विमानतळावरील सूत्रांकडून उपलब्ध झाली आहे. मागच्या २२ दिवसात गोव्यातून विविध राष्ट्रात पाठवण्यात आलेल्या या नागरिकांमध्ये ३८ चिमुकल्यांचा समावेश असल्याची माहीती विमानतळावरील सूत्रांकडून प्राप्त झाली. लॉकडाऊनमुळे गोव्यात अजूनही विविध राष्ट्रातील काही विदेशी पर्यटक अडकून राहीलेले असल्याची माहीती दाबोळी विमानतळाचे संचालक गगन मलिक यांच्याकडून प्राप्त झाली असून त्यांना सुद्धा त्यांच्या देशात पाठवण्यासाठी लवकरच उचित पावले उचलण्यात येणार असल्याचे सांगितले. लॉकडाऊन नंतर गोव्यात अडकलेल्या विविध राष्ट्रातील नागरिकांना मायदेशी पाठवण्यात येत असताना येथे सुरक्षेच्या दृष्टीने विविध प्रकारची पावले उचलण्यात आलेली असल्याची माहीती विमानतळ सूत्रांकडून प्राप्त झाली. कोरोना चा फैलाव होऊ नये याची खबरदारी बाळगताना दाबोळी विमानतळावरून विदेशी पर्यटकांना त्यांच्या मायदेशी पाठवण्यात येत असताना सामाजिक अंतर ठेवणे (सोशल डीस्टेंन्सींग), दाबोळी विमानतळ इमारतीची वेळोवेळी स्वच्छता करणे, औषधांची फव्वारणी करणे अशा प्रकारची पावले उचलण्यात आलेली असून भविष्यातही सुरक्षेच्या दृष्टीने उचित पावले उचलण्यात येणार असल्याची संचालक गगन मलिक यांनी त्यांच्याशी चर्चा करताना सांगितले.

बुधवारी २३ वे खास विमान दाबोळी विमानतळावर आल्यानंतर ४४ अमेरिकन प्रवाशांना घेऊन मायदेशी जाण्यासाठी झाले रवाना
लॉकडाऊन झाल्यानंतर गोव्यात अडकलेल्या विदेशी पर्यटकांना त्यांच्या मायदेशी पाठवण्यासाठी विविध प्रकारची पावले उचलण्यात आलेली आहेत. बुधवारी (दि. १५) लॉकडाऊन च्या काळातील २३ वे खास विमान गोव्याच्या दाबोळी विमानतळावर आल्यानंतर येथे अडकलेल्या ४४ अमेरिका राष्ट्रातील नागरिकांना घेऊन प्रथम मुंबईला रवाना झाले. सदर अमेरिका राष्ट्रातील पर्यटक गोव्यातून मुंबईला पोचल्यानंतर तेथून त्यांना त्यांच्या राष्ट्रात नेण्यासाठी नंतर विमान पुढच्या प्रवासासाठी उड्डाण घेणार अशी माहीती सूत्रांनी दिली.

Web Title: Coronavirus: In 22 days, 4 thousand 239 foreign tourists were sent from Goa to their homeland

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.