CoronaVirus News: गोव्यात तीन दिवसांत 29 कोविडग्रस्तांचे मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 07:57 PM2020-09-15T19:57:36+5:302020-09-15T19:57:54+5:30

आतापर्यंत राज्यात कोरोनाचे 315 बळी

CoronaVirus 29 corona patient died in Goa in three days | CoronaVirus News: गोव्यात तीन दिवसांत 29 कोविडग्रस्तांचे मृत्यू

CoronaVirus News: गोव्यात तीन दिवसांत 29 कोविडग्रस्तांचे मृत्यू

Next

पणजी : राज्यात गेल्या तीन दिवसांत म्हणजे रविवार, सोमवार व मंगळवारी एकूण 29 कोविडग्रस्तांचा मृत्यू झाला. डिचोलीतील एका 27 वर्षीय महिलेचाही मयत कोविडग्रस्तांमध्ये समावेश आहे. आतापर्यंत कोविडने एकूण 315 रुग्णांचे बळी घेतले आहेत.

सोमवारी चौदाजणांचे कोविडने बळी घेतल्यानंतर आरोग्य खात्याची यंत्रणा गडबडली. मुख्यमंत्री सावंत यांनी मंगळवारी उच्चस्तरीय बैठक घेतली, त्यात आरोग्य मंत्री, आरोग्य सचिव, सर्व कोविड इस्पितळांचे प्रमुख, आरोग्य केंद्रांचे अधिकारी वगैरे सहभागी झाले. मृत्यूंचे प्रमाण शून्यावर यायला हवे अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. मात्र लोकांनी ताप वगैरे लक्षणो सात-आठ दिवस अंगावर काढू नयेत असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला. होम आयसोलेशनमध्ये जे कोविडग्रस्त असतात, त्या व्यक्तींच्या आणि कोविड काळजी केंद्रातील रुग्णांच्या संपर्कात आरोग्य अधिका:यांनी रहावे अशीही सूचना मुख्यमंत्र्यांनी बैठकीत केली.

मंगळवारी नऊ कोविडग्रस्तांचा बांबोळीच्या गोमेकॉ इस्पितळात जीव गेला. मडगावच्या ईएसआय इस्पितळात दोघांचे निधन झाले. एक रुग्ण तर गोमेकॉत आल्या आल्याच मरण पावला. मडगाव येथील 68 वर्षीय पुरुष रुग्ण, पारोडा-सासष्टी येथील 83 वर्षीय रुग्ण, वास्कोतील 82 वर्षीय नागरिक, केपेतील 82 वर्षीय महिला, बागा कळंगुट येथील 34 वर्षीय पुरुष रुग्ण, सांताक्रुझ येथील 52 वर्षीय पुरुष रुग्ण, दाबोळी येथील 55 वर्षीय महिला, खोर्ली म्हापसा येथील 90 वर्षीय पुरुष रुग्ण, पर्वरी येथील 79 वर्षीय पुरुष आणि आमोणा डिचोली येथील 72 वर्षीय महिला रुग्ण यांचे मंगळवारी कोविडमुळे निधन झाले.

 कोविडमुळे मरणाऱ्यांची संख्या एकदम शून्यावर यावी ही समाजाच्या सर्व घटकांची जबाबदारी आहे. केवळ डॉक्टर किंवा सरकारचीच जबाबदारी नव्हे. कोविडची लक्षणो दिसल्यानंतर लगेच प्रत्येकाने उपचारांसाठी इस्पितळात यायला हवे. मेलेल्या अवस्थेतच कोविडग्रस्तांना इस्पितळात आणले जाते. परवा एक युवक मरण पावला, त्याला लक्षणो दिसताच लगेच इस्पितळात आणणो ही त्याच्या पालकांचीही जबाबदारी होती. वेळेत जर रुग्ण इस्पितळात आला तर त्याच्यावर उपचार करता येतात. आमच्याकडे सगळ्य़ा सुविधा आहेत. आता ऑक्सीजन देखील पुरेसा उपलब्ध आहे.
- मुख्यमंत्री प्रमोद सावंत

Web Title: CoronaVirus 29 corona patient died in Goa in three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.