गोव्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 202; नवे रुग्ण 71 आढळले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2020 08:58 PM2020-06-06T20:58:14+5:302020-06-06T20:59:38+5:30
851 कोविड चाचण्यांचे अहवाल येणे बाकी
पणजी : राज्यात कोरोना रुग्णांची एकूण संख्या शनिवारी 202 झाली. सर्वात जास्त म्हणजे 71 कोरोना रुग्ण शनिवारी गोव्यात आढळले. मांगोरहीलला 62 रुग्ण आढळले. अजून 851 कोविड चाचण्यांचे अहवाल येणे बाकी आहे. राज्यातील कोरोनाचा हा कहर पाहून सरकारची आरोग्य यंत्रणाही धास्तावू लागली आहे.
सरकारी यंत्रणोने मांगोरहीलला सर्वाच्या कोविद चाचण्या करण्याचे काम खूपच संथ केले आहे. मांगोरहीलच्या 1 हजार लोकांचे थ्रोट स्वॅब आरोग्य कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी घेतले होते. त्यानंतर जास्त लोकांची चाचणी केली गेली नाही. यापूर्वीच्याच चाचण्यांचे अहवाल आता येत आहेत. शनिवारी मांगोरहीलमध्ये 62 नवे कोविड रुग्ण आढळले. राज्यभर एकूण 2 हजार 311 कोविद चाचण्या शनिवारी करण्यात आल्या. त्यापैकी 1 हजार 389 अहवाल नकारात्मक आले. इतर अहवालांची सरकारला प्रतिक्षा आहे.
मांगोरहीलला संख्या 170
शुक्रवारी मांगोरहीलला 26 कोरोना रुग्ण आढळले होते. आता तिथे एकूण संख्या 170 झाली आहे. अजून चाळीस टक्के लोकांच्या होणो बाकी आहे. मांगोरहीलला रुग्णसंख्या वाढतेय असे दिसू नये म्हणून सरकारने तिथे लोकांचे चांचण्यांसाठी नवे नमूने स्वीकारणो खूपच संथ केले आहे, अशी चर्चा काही मंत्र्यांमध्येही सुरू आहे. मांगोरहीलचे लोक सध्या बाहेर कुठे जाऊ शकत नाहीत, त्यामुळे त्यांच्यामुळे कोरोनाचा फैलाव गोव्याच्या अन्य भागात होणार नाही असेही काही लोकप्रतिनिधींना वाटते. बुधवारी मांगोरहीलला 42 रुग्ण आढळले होते.
मडगावच्या कोविद इस्पितळाची क्षमता 230 आहे. तथापि, तिथे आताच 202 रुग्ण उपचार घेत आहेत. यामुळे सरकारला दुसरे पर्यायी इस्पितळ पहावेच लागेल. आतार्पयत म्हणजे सुरूवातीपासून एकूण 267 कोरोना रुग्ण गोव्यात आढळले व त्यापैकी 65 रुग्ण बरे झाले.
नऊ रुग्ण मांगोरहील बाहेरील
जे 71 नवे रुग्ण आढळले, त्यापैकी नऊ रुग्ण हे बाहेरील आहेत. त्यांचा मांगोरहीलशी संबंध नाही. नऊपैकी तिघेजण दिल्लीहून विमानाने गोव्यात आले होते. तिघेजण रस्तामार्गे गोव्यात आले. या तिघांपैकी दोघे महाराष्ट्रातून आले तर एकटा कर्नाटकातून आला. लोक कोरोना रुग्ण सापडले म्हणून विविध गावांची नावे सध्या घेत आहेत. अफवाही बऱ्याच पिकत आहेत. बांबोळीच्या गोमेकॉ इस्पितळाच्या आयसोलेशन विभागात 12 संशयीत शनिवारी दाखल झाले. मात्र त्यांना कोरोना झालेला नाही.
आरोग्य कर्मचारी जाईनात
मांगोरहीलला यापूर्वी गेलेले काही आरोग्य कर्मचारी कोविद पॉङिाटीव झाल्याची चर्चा पसरल्यानंतर आता जास्त कर्मचारीच तिथे जायला शोधत नाहीत. मांगोरहीलला नव्या चाचण्या कमी होण्याचे तेही एक कारण असल्याचे सांगितले जाते. सरकार सध्या प्रसार माध्यमांर्पयत व्यवस्थित माहिती पोहचविण्याबाबत लपवाछपवी करतेय अशा प्रकारचा आरोप विरोधक करत आहेत. ज्या दिवशी जास्त कोरोना रुग्ण आढळतात, त्या दिवशी सरकार पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरे जाऊ पाहत नाही. त्यामुळेच पत्रकार परिषद घेण्यास टाळाटाळ केली जाते. शनिवारी सायंकाळी आरोग्य सचिव पत्रकार परिषद घेतील असा संदेश आला होता. मात्र अचानक पत्रकार परिषद रद्द केली गेली. आरोग्य मंत्री बोलले तर सरकारमधील काहीजणांना राग येत असल्याने तेही बोलत नाहीत.
ग्रामीण भागात चाचणी
सत्तरी तालुक्यातील गुळेली व राज्यातील अन्य काही ग्रामीण भागांमध्ये सरकारी यंत्रणा जाऊन सध्या लोकांची रॅण्डम अशी कोविद चाचणी करून पाहत आहे. काही आरोग्य कर्मचाऱ्यांची जिथे घरे आहेत, त्या घरांच्या आसपासच्या लोकांचीही कोविड चाचणी केली जात आहे. ह्या सगळ्य़ा चाचण्या निगेटिव्हच आल्या आहेत. साखळीत एक फळ विक्रेता पॉझिटिव्ह आला अशी अफवा काहीजणांनी पसरवली होती. त्याची चाचणी प्रत्यक्षात पॉझिटिव्ह आलेली नाही.
राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढले तरी, लोकांनी शांत रहावे. गोव्याला सुरक्षित ठेवण्यासाठी सरकार आवश्यक ती सगळी उपाययोजना करत आहे. गुळेली येथे लोकांचे नमूने घेऊन तपासणी केली जात आहे.
- विश्वजित राणो, आरोग्य मंत्री