coronavirus: गोव्यात आणखी एका डॉक्टरला कोरोनाची लागण, एकूण रुग्णसंख्या 560 वर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 08:38 PM2020-06-17T20:38:25+5:302020-06-17T20:38:45+5:30
गोव्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत पण मंगळवारच्या तुलनेत बुधवारी कमी कोरोनाग्रस्त आढळले.
पणजी - राज्यात कोरोनाचे 27 नवे रुग्ण बुधवारी होणार आहे. एकूण रुग्ण संख्या 560 झाली आहे. 11 रुग्ण कोरोना आजारातून बरे झाले. कुठ्ठाळीत राहणा-या एका खासगी डॉक्टरलाही कोरोनाची लागण झाली आहे. पर्वरीतही बुधवारी एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळली.
राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत पण मंगळवारच्या तुलनेत बुधवारी कमी कोरोनाग्रस्त आढळले. आतार्यंत एकूण 96 व्यक्ती कोरोनातून ब:या झाल्या. एकूण 1 हजार 949 चाचण्या बुधवारी केल्या गेल्या. त्यापैकी 1353 व्यक्तींचे अहवाल निगेटीव आले. 569 व्यक्तींचे अहवाल येणो बाकी आहे. गोमेकॉ इस्पितळाच्या आयसोलेशन विभागात एकूण पंधरा संशयीत दाखल झाले आहेत. ही माहिती आरोग्य खात्याच्या सचिव निला मोहनन यांनी येथे प्रकार परिषदेत दिली. रस्ता, रेल्वे व विमानाने प्रवास केलेल्या प्रवाशांमध्ये आतार्पयत एकूण 74 कोरोनाग्रस्त आढळले आहेत. एकूण 45 हजार 685 व्यक्तींच्या चाचण्या आतार्पयत झालेल्या आहेत.
तीन इमारती कंटेनमेन्ट झोन
बायणा येथे तीन इमारती कंटेनमेन्ट झोन केल्या गेल्या आहेत. बायणाच्या बर्फाच्या कारखान्याकडे या तीन इमारती आहेत. पर्वरीत एक ज्येष्ठ नागरिक कोरोनाग्रस्त आढळला. कुठ्ठाळीला जो डॉक्टर कोरोनाग्रस्त आढळला, त्याच्या संपर्कात कोण कोण आले होते, त्याने कुणा कुणाला तपासले होते याचा शोध आरोग्य खाते घेत आहे. बेती येथील जो सुरक्षा रक्षक कोरोनाग्रस्त आढळला होता, तो आता खूपच बरा झाला आहे. तो वेन्टीलेटरवर तर आता नाहीच. त्याची प्रकृती सुधारत आहे, असे मोहनन यांनी स्पष्ट केले.
तिघे पोलिस कोरोनाग्रस्त
मांगोरहील तालुक्यात तीन पोलिस कोरोनाग्रस्त आढळले. त्यापैकी एकटा वास्को पोलिस स्थानकावर काम करत होता तर दोघे मांगोरहीलच्या स्थानकावर होते, असे श्रीमती मोहनन यांनी स्पष्ट केले. कोरोनाग्रस्त पोलिसांची राज्यातील एकूण संख्या चार झाली आहे. बेतीच्या कोरोना रुग्णाला आणून गोमेकॉ इस्पितळात सोडल्यानंतर जे दोघे गायब झाले होते, त्यांचा शोध अजून लागलेला नाही.
दरम्यान, महसुल सचिव संजयकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार आतार्पयत गोव्याहून 57 रेल्वे देशाच्या विविध भागात गेल्या. त्यातून 1 लाख 27 हजार व्यक्ती त्यांच्या मूळगावी गेल्या. जे मास्क न घालता सार्वजनिक ठिकाणी फिरतात अशा व्यक्तींविरुद्ध कारवाई करणो सुरूच आहे. एकूण 26 हजार 597 व्यक्तींविरुद्ध कारवाई झाली आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबाबत 9 हजार 805 व्यक्तींना दंड ठोठावला गेला आहे